‘त्या’ व्यापाऱ्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची मागणी

नामपूर, जि. नाशिक : कांदा विक्रीची थकीत रक्कम तातडीने मिळावी, या मागणीचे निवेदन सहायक निबंधक चंद्रकांत विघ्ने, मंडळ अधिकारी चंद्रकांत अहिरे यांना देण्यात आले. या वेळी बाजार समितीचे प्रभारी सभापती अविनाश सावंत आदी. (छायाचित्र : प्रशांत बैरागी, नामपूर)
नामपूर, जि. नाशिक : कांदा विक्रीची थकीत रक्कम तातडीने मिळावी, या मागणीचे निवेदन सहायक निबंधक चंद्रकांत विघ्ने, मंडळ अधिकारी चंद्रकांत अहिरे यांना देण्यात आले. या वेळी बाजार समितीचे प्रभारी सभापती अविनाश सावंत आदी. (छायाचित्र : प्रशांत बैरागी, नामपूर)

नाशिक  : दोन महिन्यांत शेतकऱ्यांकडून सुमारे साडेतीन कोटी रुपयांच्या कांद्याची खरेदी करून बांगलादेशात पैसे घेण्यासाठी गेलेला मालेगाव तालुक्‍यातील मुंगसे येथील व्यापारी शिवाजी सूर्यवंशी बेपत्ता आहे. त्यामुळे मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने संबंधित व्यापारी व जामीनदार प्रल्हाद अग्रवाल या दोघांच्याही मालमत्तांचा लिलाव करून शेतकऱ्यांचे पैसे अदा करण्याची अनुमती मिळविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले. 

मालेगाव तालुक्‍यातील शिवाजी सूर्यवंशी यांनी डिसेंबर २०१७ व जानेवारी २०१८ या काळात तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी केला. सुमारे साडेतीन कोटी रुपये शेतकऱ्यांना देणे असताना सूर्यवंशी यांनी बांगलादेशातील व्यापाऱ्याला सदरचा कांदा पाठविला. परंतु तेथून पैसे मिळत नसल्याने ते पैसे घेण्यासाठी बांगलादेशला गेले असून त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नसल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे म्हणणे आहे. 

शेतकऱ्यांना चार महिन्यांपासून पैसे न मिळाल्यामुळे बाजार समितीने अडत्याकडून एक कोटी रुपये वसूल करून शेतकऱ्यांना वाटप केले. परंतु तरीही अन्य शेतकऱ्यांना पैसे मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करण्याची भीती बाजार समितीला वाटू लागली आहे. त्यामुळे सूर्यवंशी यांनी बाजार समितीकडून परवाना घेत असताना त्यांच्या मालकीची मुंगसे शिवारातील शेतजमीन तारण म्हणून ठेवलेली आहे. तर त्यांचे जामीनदार उमराण्याचे प्रल्हाद ताराचंद अग्रवाल यांनी अडत्याची आर्थिक जबाबदारी स्वीकारली असल्याने त्यांचा उमराणे येथील बंगला तारण ठेवला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com