धुळे, जळगाव जिल्ह्यांत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
चंद्रकांत जाधव
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

जळगाव : धुळे आणि जळगाव जिल्ह्यांत जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत ऐन पिकांच्या वाढीच्या काळात पावसाने ओढ दिल्यामुळे पिके वाया गेली. तसेच रब्बी हंगामही जेमतेम राहील, अशा स्थिती आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी आणि शेतकरी संघटना करत आहेत.

पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणी करावी लागली. त्याचे पंचनामे अजूनही झालेले नाहीत. त्यानंतर तिबार पेरणी करूनही फारसा उपयोग झाला नाही. धुळे जिल्ह्यात धुळे व शिंदखेडा तालुक्‍यांत सर्वाधिक बिकट स्थिती होती. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला.

जळगाव : धुळे आणि जळगाव जिल्ह्यांत जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत ऐन पिकांच्या वाढीच्या काळात पावसाने ओढ दिल्यामुळे पिके वाया गेली. तसेच रब्बी हंगामही जेमतेम राहील, अशा स्थिती आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी आणि शेतकरी संघटना करत आहेत.

पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणी करावी लागली. त्याचे पंचनामे अजूनही झालेले नाहीत. त्यानंतर तिबार पेरणी करूनही फारसा उपयोग झाला नाही. धुळे जिल्ह्यात धुळे व शिंदखेडा तालुक्‍यांत सर्वाधिक बिकट स्थिती होती. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला.

पोळा सणाच्या वेळी बरा पाऊस झाला. पण पिके हातची गेल्याचे धुळे तालुक्‍यातील कापडणे येथील शेतकरी आत्माराम पाटील यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यात पश्‍चिम पट्ट्यात बेताचाच पाऊस होता. त्यामुळे चाळीसगाव, एरंडोल, पारोळा, पाचोरा, भडगाव या तालुक्‍यांना वरदान ठरणारे बहुळा, मन्याड, भोकरबारी, बोरी, अग्नावती, अंजनी या प्रकल्पांमध्येही फारसा जलसाठा नाही. या भागातही रब्बी हंगाम फारसा बहरणार नाही. पाणीटंचाईचा सामना हिवाळ्यातच करावा लागेल, अशी स्थिती आहे.

हंगामी पैसेवारी फसवी
बोदवड, जळगाव, धुळे, शिरपूर, चोपडा, पाचोरा, अमळनेर या भागांतील अनेक गावे हंगामी पैसेवारीत ५० पैशांच्या पुढे दाखविले आहेत. या पैसेवारीमुळे या गावांमध्ये दुष्काळ जाहीर होणार नाही, असे चित्र आहे. परंतु अशा स्थितीमध्ये प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी पाठपुरावा करून वस्तुस्थिती समोर मांडण्यासाठी काम करायला हवे, असे आसोदे येथील शेतकरी किशोर चौधरी यांनी म्हटले आहे.

 

हंगामी पैसेवारी ५० पैशांच्यावर जातेच कशी, हा प्रश्‍न आहे. उडीद, मूग सडले. बाजार समितीत आवक नाही, तुटवडा असताना उडीद, मुगाला भाव नाही. व्यापारी व शासन यांची एकजूट झाली असून, शेतकऱ्यांवर अन्याय सुरू झाला आहे.
- कडूअप्पा पाटील,
माजी जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना

 

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांना...नगर  : राज्यात कर्जमाफी मिळणारे सर्वाधिक...
राज्य सरकारचे धोरण शेतकरी हिताचे ः जानकरउस्मानाबाद  : राज्य सरकारचे धोरण...
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा सरकारचा...नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत...
सणाच्या दिवशी शेतकऱ्यांचे ठेचा भाकर...बुलडाणा : एेन सण काळात स्वाभिमानी शेतकरी...
शेतीपूरक व्यवसायाच्या आराखड्याचे काम...पुणे : शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असली तरी,...
औरंगाबाद येथे कर्जमाफी प्रमाणपत्राचे... औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्हाधिकारी...
देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी ः... सातारा  : शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस...
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी... हिंगोली : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा...
कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड ः... नांदेड : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
शासन शेतीमाल प्रक्रिया उद्योगांवर भर... जळगाव  ः शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी...
असंतोष विभागण्यासाठीच कर्जमाफीचे...मुंबई : सरकारने कर्जमाफीसाठी ज्या अटी- शर्ती लागू...
संत गजानन महाराज संस्थान करतेय...शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज...
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी...मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या...
औरंगाबादेत २९ ऑक्‍टोबरला 'मराठा महासभा' औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे...
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...