agriculture news in Marathi, agrowon, The demand of the tur purchase center extention | Agrowon

तूर खरेदीच्या मुदतवाढीची केंद्राकडे मागणी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 5 मे 2018

मुंबई  : राज्यात मोठ्या प्रमाणात तूर खरेदी शिल्लक असून, तूर खरेदीला ३० जूनपर्यंत मुदतवाढ द्यावी. तसेच खरेदी करण्यात येणारी तूर ठेवण्यासाठी इतर राज्यातील गोदामे उपलब्ध करून देण्याची मागणी राज्य सरकारने केंद्र शासनाकडे केली आहे.

मुंबई  : राज्यात मोठ्या प्रमाणात तूर खरेदी शिल्लक असून, तूर खरेदीला ३० जूनपर्यंत मुदतवाढ द्यावी. तसेच खरेदी करण्यात येणारी तूर ठेवण्यासाठी इतर राज्यातील गोदामे उपलब्ध करून देण्याची मागणी राज्य सरकारने केंद्र शासनाकडे केली आहे.

केंद्रीय कृषी मंत्री राधामोहनसिंह यांना पाठवलेल्या पत्राद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. पत्रामध्ये म्हटले, की राज्य शासनातर्फे नाफेड, पणन महासंघ आणि विदर्भ पणन महासंघाच्या मदतीने तूर खरेदी करण्यात येत आहे. राज्यातील तूर खरेदी केंद्रांवर ४ लाख ५७ हजार ९३० शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी २ लाख ९ हजार ४२८ शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली आहे. अजूनही २ लाख ४८ हजार ५०० शेतकऱ्यांची १८ लाख ६८ हजार क्विंटल तूर खरेदी करणे शिल्लक आहे. तसेच केंद्राने राज्याला ३० लाख क्विंटल हरभरा खरेदीचे उद्द‍िष्ट असून, आतापर्यंत नोंदणी केलेल्या १ लाख ४८ हजार शेतकऱ्यांपैकी २६ हजार ७८३ शेतकऱ्यांकडून ३ लाख ६५ हजार ४०० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे.

राज्यातील गोदामांमध्ये सुमारे १०० लाख क्विंटल तूर ठेवण्यात आलेली असल्यामुळे खरेदी करणे बाकी असलेली तूर आणि हरभरा ठेवण्यासाठी गोदामांमध्ये जागा शिल्लक नाही. या कारणाने गेल्या वर्षी खरेदी करण्यात आलेली गोदामांमध्ये शिल्लक असलेली तूर विकण्यासाठी नाफेडला निर्देश द्यावेत. वाढवून दिलेल्या १५ मेपर्यंतच्या मुदतीतही तूर खरेदी करणे शक्य नसून, तूर खरेदीचा कालावधी ३० जून २०१८ पर्यंत वाढविण्यात यावा. तसेच इतर राज्यातील गोदामे उपलब्ध करून द्यावीत, तूर खरेदीची मर्यादा १२ लाख ३६ हजार क्विंटलपर्यंत वाढवून द्यावी, अशी विनंती या पत्राद्वारे केंद्र शासनाला केल्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले.

इतर ताज्या घडामोडी
गाजराच्या शिल्प दुनियेत...उत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील...
जळगावातील १२० कोटींच्या कामांना...जळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी...
सूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
परभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे उद्भवलेल्या...
'निर्यातदार व्यापाऱ्यांनी साखळी करुन दर...आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्‍यात...
शेततळ्याचे मुख्यमंत्र्यांनी केले ‘...सोलापूर ः बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील...
अकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल ३२०० ते...अकोला ः अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सूक्ष्म सिंचनाचा परिणामकारक वापर शक्‍य...औरंगाबाद : सूक्ष्म सिंचनाची समज व गरज, त्यामधील...
भावांनो घाबरू नका, आम्ही वाऱ्यावर...खोजेवाडी जि. नगर ः ‘‘दुष्काळ जाहीर होऊन अडीच...
साताऱ्यात एकरकमी एफआरपीसाठी...सातारा : एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी...
जुन्नर तालुक्यातील द्राक्षे चीन आणि...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यात जंबो, शरद...
हिवाळ्यात करा फळबागांतील तापमान नियोजनहिवाळ्यामध्ये कमी होणारे तापमान ही विविध...
गादीवाफ्यावर करा भुईमूग लागवडभुईमुगाची गादीवाफ्यावर पेरणी एक मीटर रुंदीचे...
बायोलेजिक्स औषधांची परिणामकारकता वाढणारयेल विद्यापीठातील संशोधकांनी शोधलेल्या...
हवामान बदलाचा युरोपियन देशांना फटकायुरोपमध्ये पाण्याच्या पूर्ततेसाठी अन्य सीमावर्ती...
बार्शीटाकळीत कांदा बियाणे उगवेना अकोला : पेरणी केल्यानंतर महिना उलटूनही ‘महाबीज’चे...
मुख्यमंत्र्यांच्या ‘लोकसंवाद’...अकोला : शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोचल्यानंतर...
उन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकरी उदासीनजळगाव : खानदेशात उन्हाळ, रांगडा कांदा...
वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा...वर्धा : या हंगामातील नवीन तूर मळणीला सुरवात...
कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब...परभणी ः दुष्काळी स्थितीत फळबागा वाचविण्यासाठी...