नाशवंत शेतीमालाच्या उत्पादनाचा अंदाज देणारी यंत्रणा उभारावी

नाशवंत शेतीमालाच्या उत्पादनाचा अंदाज देणारी यंत्रणा उभारावी

पुणे : बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठ्याचे प्रमाण विस्कळित झाले, तर त्याचा परिणाम थेट शेतीमालाच्या बाजारभावावर हाेताे. अतिरिक्त उत्पादनामुळे हाेणारे नुकसान टाळण्यासाठी गावपातळीवर नाशवंत शेतीमालाची लागवड आणि संभाव्य उत्पादनाचा अंदाज देणारी यंत्रणा उभारण्यात यावी. या यंत्रणेद्वारे बाजारपेठेतील शेतीमालाचा पुरवठा, साठवणूक, प्रक्रिया, निर्याती बाबतची धाेरणे राबवावी, अशी शिफारस नाशवंत शेतीमालाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना याेग्य बाजारभाव मिळावा, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने शासनाकडे केली आहे. 

काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणासाठी संस्था स्थापन करावी, अशीदेखील शिफारस करण्यात आली आहे. काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाच्या अभावामुळे दरवर्षी देशात लाखाे काेटी रुपयांच्या शेतीमालाचे नुकसान हाेते. हे आर्थिक नुकसान थेट शेतकऱ्यांचे हाेत असल्याने हे नुकसान टाळून नाशवंत शेतमालाला याेग्य दर मिळण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने शेतीमाल काढणी ते प्रक्रिया आणि निर्यातीसाठीच्या महत्त्वपूर्ण शिफारसींचा अहवाल शासनाला सादर केला. या विविध शिफारसींच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारला याेजना आखावी लागणार आहे, अशी महिती श्री. पवार यांनी ''ॲग्राेवन''ला दिली.

विशेष वस्तू बाजाराची स्थापना करणे  महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन १९६३ कलम ४(४) अंतर्गत विशेष वस्तूंचा बाजार स्थापन करण्याची तरतूद आहे. या तरतूदीअंतर्गत एखाद्या विशिष्ट भागामध्ये एखाद्या विविष्ट शेतीमालाचे माेठ्या प्रमाणावर उत्पादन हाेते. अशा ठिकाणी विशेष वस्तू बाजाराची स्थापना करून त्या ठिकाणी पायाभूत सुविधांसह, मूल्यवर्धन प्रक्रिया उद्याेगांसाठी प्राेत्साहन देणे गरजेचे आहे. यासाठी एका छताखाली शेतकरी, खरेदीदार, निर्यातदार, प्रक्रिया उद्याेगांना साेयी सुविधा निर्माण करून देणे आवश्‍यक आहे. 

स्मार्ट बाजार समित्या निर्माण करणे  बाजार समित्यांमधून केवळ शेतीमालाची खरेदी विक्री केली जाते. मात्र शेतीमालावर मूल्यवर्धन करण्यासाठी बाजार समित्यांमध्ये यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे. आर्थिक सक्षम असलेल्या बाजार समित्यांमध्ये गाेदामे, शीतगृहे, धान्य चाळण यंत्रणा, शिल्लक शेतीमालावर डिहायड्रेशन प्रकल्प आदी प्रकल्प उभारावेत. 

२५ वर्षांचे शीतसाखळी धाेरण राबवावे  पुढील २५ वर्षांत राज्यात नाशवंत शेतीमालाचे हाेणाऱ्या उत्पादनाचा अंदाज घेता गाव आणि तालुका पातळीवर किती शीतगृहांची आवश्‍यकता आहे. याचे सर्वेक्षण करून, पुढील २५ वर्षांचे शीतगृह उभारणीचे धाेरण राबविण्याची गरज आहे. यासाठी सद्यःस्थितीतील शीतगृहांची संख्या त्यामध्ये ठेवण्यात आलेला शेतीमाल, त्याची व्यवहार्हता याचा समावेश करावा. त्यानंतर धाेरण ठरवून त्याची याेजना करण्यात यावी. 

नाशवंत शेतीमालाचे ब्रॅडिंग  विविध शेतीमालांची विशिष्ट आेळख असते. त्या शेतमालांच्या भाैगाेलिक आेळखींनुसार त्याची चव, रंग, गुणधर्मांचे ब्रॅडींग करण्यात यावे. व त्याच ब्रॅण्ड नावाने त्यांची विक्री करण्यात यावी. यामुळे किमान १० ते २० टक्क्यांनी शेतीमालाच्या दरात वाढ संभवते. यामुळे गावपातळीवर अशी उत्पादने शाेधून शेतकऱ्यांना प्रशिक्षण व प्राेत्साहन देणे गरजेचे आहे. ब्रॅंडची नाेंदणी आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी प्रतिशेतकरी २५ हजार रुपये अनुदान देण्यात यावे. या माध्यमातून गाव पातळीवरील शेतीमालाचे ब्रॅंड तयार हाेतील. 

शेतकरी आठवडे बाजाराचे सक्षमीकरण करणे  संत शिराेमणी श्री सावतामाळी शेतकरी आठवडे बाजार अभियान सध्या सुरू असून, आणखी बाजार वाढविणे व असणाऱ्या बाजारांचे सक्षमीकरणासाठी शेतकरी गटांना रास्त दरात पायाभूत सुविधा आणि सामग्री उपलब्ध करून देण्यात यावी. 

समितीच्या शिफारशी  -   ग्रामपंचायत आणि कृषी विभागाने नाशवंत शेतीमालाची लागवड आणि उत्पादनाचा अंदाजाबाबत सल्ला देणे.   - शेतीमालाचा दर्जा राखण्यासाठी टिकवण क्षमतेत वाढ करणारे तंत्रज्ञान शेतावरच शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे.    - शेतीमालाच्या मूल्यवर्धनासाठी प्रतवारी, पॅकिंग, प्राथमिक प्रक्रिया तंत्रज्ञान रास्त दरात बांधावरच उपलब्ध करून देणे.    -  काढणी ते बाजारपेठेदरम्यान शेतीमाल हाताळणी करणाऱ्या विविध घटकांना प्रशिक्षण देणे. (उदा. शेतकरी, शेतमजूर, वाहन चालक, हमाल, आडते, ताेलणार आदी)    -  प्रशिक्षणासाठी राज्यस्तरीय काढणीपश्‍चात प्रशिक्षण संस्था स्थापन करणे.   -  शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जाळे निर्माण करून त्यांना नॅशनल फूड सिक्युरिटी मिशनप्रमाणे प्राेत्साहन देणे.     - ग्रामपंचायत, तालुका आणि जिल्हा पातळीवर छाेटे, माेठे प्रक्रिया उद्याेग उभारणे     विशेष वस्तू बाजाराची स्थापना करणे.    - स्मार्ट बाजार समित्या निर्माण करणे.   - पुढील २५ वर्षांचे शीतसाखळी धाेरण राबविण्यात यावे.     - नाशवंत शेतीमालाचे ब्रॅडिंग   -  शेतकरी आठवडे बाजाराचे सक्षमीकरण करणे.   

नाशवंत शेतीमालाला याेग्य बाजारभाव मिळण्यासाठी करावयाच्या उपाययाेजनांच्या शिफारसींचा अहवाल शासनाला नुकसाच सादर केला आहे. या अहवालात काढणी ते प्राथमिक प्रक्रिया, प्रक्रिया उद्याेग आणि निर्यातीसाठीच्या करावयाच्या उपयायाेजनांच्या विविध शिफारसी शासनाला सादर केल्या आहेत. यासाठी विविध याेजना आखाव्या लागणार अाहेत. तर शेतकऱ्यांना आणखी काही उपाययाेजना सुचवाव्या वाटत असतील, तर त्यांनी md@msamb.com आणि genmen@msamb.com  या ईमेल वर पाठवाव्यात. - सुनील पवार, कार्यकारी संचालक, महाराष्‍ट्र राज्य पणन मंडळ, पुणे  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com