agriculture news in Marathi, agrowon, Dhule district drop from gram harvest program | Agrowon

हरभरा पीक प्रात्यक्षिकातून धुळ्याला वगळले
चंद्रकांत जाधव
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

धुळे : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या हरभरा पीक प्रात्यक्षिकातून धुळे जिल्ह्यास यंदा वगळण्यात आले आहे. राज्यातील जळगावसह इतर जिल्ह्यांमध्ये हा पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविला आहे, पण धुळ्यालाच का वगळले, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करत आहेत.  

धुळे : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या हरभरा पीक प्रात्यक्षिकातून धुळे जिल्ह्यास यंदा वगळण्यात आले आहे. राज्यातील जळगावसह इतर जिल्ह्यांमध्ये हा पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविला आहे, पण धुळ्यालाच का वगळले, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करत आहेत.  

२०११-१२ पासून धुळे जिल्ह्यात रब्बी पीक प्रात्यक्षिकांतर्गत हरभऱ्यासंबंधी अनुदान दिले जात होते. १७०० हेक्‍टर क्षेत्रासाठी हा कार्यक्रम मंजूर होता. त्यासाठी हेक्‍टरी सात हजार ५०० रुपये अनुदान दिले जायचे. जिल्ह्यास एकूण एक कोटी २७ लाख ५० हजार रुपये अनुदान मिळायचे. परंतु, यावर्षीच्या रब्बी हंगामासंबंधीच्या पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमातून धुळे जिल्ह्याला वगळण्यात आले. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. 

जवळपास चार ते पाच हजार शेतकरी या पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमात सहभागी होऊन हरभऱ्याचे अधिकाधिक उत्पादन घ्यायचे. यंदा हरभऱ्या व्यतिरिक्त गहू, ज्वारी या पिकांसाठीही पीक प्रात्यक्षिके जिल्ह्यात दिलेली नाहीत. हा धुळे जिल्ह्यावर अन्याय असल्याचे धुळे जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनी महासंघाने म्हटले असून, यासंदर्भात कृषी आयुक्त यांना निवेदन सादर केले आहे. 

रब्बी ज्वारी पीक प्रात्यक्षिकेही नाहीत
राज्यात आठ जिल्ह्यांमध्ये रब्बी ज्वारीसंबंधीची पीक प्रात्यक्षिके असतात. राज्यात ६४ हजार हेक्‍टवर हा कार्यक्रम असतो, पण या कार्यक्रमातही धुळे जिल्ह्यास सहभागी करून घेतले नाही. यासंदर्भातही कृषी आयुक्तालयाकडे मध्यंतरी मागणी केली होती. परंतु, ही मागणीदेखील दुर्लक्षित आहे. ही बाब धुळे जिल्ह्याच्या दृष्टीने कृषी विकासाला खीळ बसविणारी आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घ्यावी, अशी अपेक्षा शेतकरी उत्पादक कंपनी महासंघाने व्यक्त केली आहे. 

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...