जमीन सुपीकता विषयावर जळगावात आज मंथन

जमीन सुपीकता विषयावर जळगावात आज मंथन
जमीन सुपीकता विषयावर जळगावात आज मंथन

जळगाव  ः शेतकऱ्यांना शेतीचे ज्ञान, यशोगाथा, शेतीसंबंधीच्या बाजारातील घडामोडींची माहिती रोज सांगणाऱ्या अॅग्रोवनतर्फे बुधवारी (ता. ३०) जमीन सुपीकता या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी १.३० यादरम्यान नवीन बस स्थानकाजवळच्या कांताई सभागृहात हे चर्चासत्र होईल. 

यूपीएल हे या चर्चासत्राचे प्रस्तुतकर्ते असून, राईज एन शाईन बायोटेक हे सहप्रायोजक आहेत. या चर्चासत्रात महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, रसायनमुक्त शेती करणारे धुळे येथील प्रभाकर भिला चौधरी व कोल्हापूर येथील प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर हे मान्यवर मार्गदर्शन करतील. जमिनीचे आरोग्य दिवसागणिक ढासळत आहे. शेती संकटात सापडली असून, या पार्श्‍वभूमीवर ॲग्रोवनने २०१८ हे जमीन सुपीकता वर्ष म्हणून जाहीर केले आहे. 

जमीन सुपीकता विषयावरील चर्चासत्र सर्वप्रथम पुणे येथे १७ एप्रिल, २०१८ रोजी आयोजित केले. त्यात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अशा चर्चासत्रांची मागणी विविध भागांतून पुढे येऊ लागली. ही बाब लक्षात घेता खानदेशातील शेतकऱ्यांसाठी या चर्चासत्राचे आयोजन केले आहे.

खानदेशात तापी, गिरणा आदी महत्त्वाच्या नद्या व काळीकसदार जमीन यामुळे समृद्धी आली. परंतु जमिनीमधील घटते सेंद्रिय कर्ब, क्षारपड जमिनी असे प्रश्‍न भेडसावू लागले आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर हे चर्चासत्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. प्रवेश विनामूल्य असणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com