मोदींच्या पराभवाची चर्चा चहाच्या टपरीवरच होईल : राजू शेट्टी

बुलडाणा ः देऊळगाव मही येथे झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित खासदार राजू शेट्टी, रविकांत तुपकर व इतर
बुलडाणा ः देऊळगाव मही येथे झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित खासदार राजू शेट्टी, रविकांत तुपकर व इतर

बुलडाणा  ः पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला गांधीवादी व लोकशाहीचे पुजारी असल्याचा आव आणतात. मोदींना एवढी लोकशाहीची चाढ असेल, तर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विशेष अधिवेशन बोलाविण्याची आम्ही केलेली मागणी मान्य करावी. अन्यथा मोदी हे ढोंगी आहेत, असे समजले पाहिजे, अशी टीका करीत ज्यांनी चहाचं भांडवल करून लोकांना फसविले तिच मंडळी मोदींचा पराभव का झाला याची चर्चा चहाच्या टपरीवर करताना दिसतील, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला. 

देउळगाव मही येथील शेतकरी सन्मान अभियानांतर्गत आयोजित एल्गार मेळाव्यात बोलत खासदार शेट्टी बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ''शेतकरी सन्माना यात्रा'' शनिवारी (ता. ५)  देऊळगाव मही येथे पोहचली. याठिकाणी जाहीर सभा झाली.

व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, कवी ज्ञानेश वाकुडकर, युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडगूले, महिला प्रदेशाध्यक्षा रसिकाताई ढगे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख घनशाम चौधरी, मराठवाडा प्रमुख माणिकराव कदम, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. खा. शेट्टी पुढे म्हणाले, संकटात सापडलेल्या, खचलेल्या शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे ही सन्मान यात्रा काढण्यात आली आहे. ही लढाई व्यवस्था परिवर्तनाची आहे. नेतृत्व स्थापन करण्यासाठी नाही. सरकारचे आयात धोरण हे शेतकऱ्यांना मारक ठरत असल्याने शेतकरी देशोधडीला लागला. सरकारने स्वामिनाथन आयोगाची शिफारस स्विकारली असती तर वेतन आयोगाप्रमाणे सरकारला फरक द्यावा लागला असता. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com