चला जालन्याला... ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला...

चला जालन्याला... ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला...
चला जालन्याला... ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला...

जालना : शेतकऱ्यांसह सर्वांचीच उत्सुकता लागून असलेल्या सकाळ -ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला उद्योगनगरी म्हणून ख्याती असलेल्या जालना शहरात शुक्रवारी (ता. १९) प्रारंभ होत आहे. शेतकरी व संबंधित क्षेत्राला ज्ञानातून विकासाकडे आणि आधुनिकतेतून समृद्धीकडे नेण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून केला जाणार असल्याने शेतकऱ्यांसह सर्वांसाठी ही मोठी पर्वणी राहणार आहे.  सकाळ-ॲग्रोवनच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला विकासाच्या दिशेने नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. शेतकऱ्यांना शेती व पूरक क्षेत्रातील नवतंत्रज्ञानाशी अवगत करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून जालन्यात आयोजित कृषी प्रदर्शनाकडे पाहिले जात आहे. मे. बी.जी. चितळे आणि चितळे जिनस एबीएस इंडिया, कृषी विभाग जालना, आत्मा जालना या प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत.  शेतकऱ्यांसाठी माहितीचा खजिना असणाऱ्या या कृषी प्रदर्शनात आधुनिकतेकडे नेणाऱ्या तंत्रज्ञानाचा आविष्कार पाहायला मिळणार आहे. हे प्रदर्शन म्हणजे ज्ञान व माहितीचा एकप्रकारे खजीनाच असणार आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या परिसंवादाच्या दालनात नामवंत तज्ज्ञांचे प्रगतिशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शनही प्रदर्शनाला भेट देणाऱ्या व सहभागी होणाऱ्यांना दररोज लाभणार आहे.   प्रदर्शनात हे बघता येईल  या प्रदर्शनाच्या माध्यमातून तंत्रज्ञान व कृषिविषयक उत्पादनाच्या विविध कंपन्या शेतकऱ्यांच्या भेटीला येत आहेत. यामध्ये ट्रॅक्‍टर्स, हार्वेस्टिंग यंत्रे, विविध प्रकारची अवजारे व कापणी यंत्र उत्पादक कंपन्या, जैविक कीटकनाशके, विद्राव्य खते, ग्रीन हाउस टेक्‍नॉलॉजी आणि इंप्लीमेंट्‌स, बियाणे उत्पादक टिश्‍युकल्चर, ठिबक व तुषार सिंचन, पॅकेजिंग आणि कोल्ड स्टोरेज इंडस्ट्रीज, ग्रेडिंग,वेईंग, सोर्टिंग अवजारे उत्पादक कंपन्या,  कृषी साहित्य प्रकाशन, कृषी संशोधन संस्था सहभागी होत आहेत.  तीन दिवस चालणार प्रदर्शन  जालन्यातील नगरपालिकेच्या आझाद मैदानावर १९ ते २१ जानेवारीदरम्यान तीन दिवस हे प्रदर्शन होणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान हे प्रदर्शन शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी खुले राहणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com