शेतीचं 'इंटेलिजंट' भविष्य

शेतीचं 'इंटेलिजंट' भविष्य
शेतीचं 'इंटेलिजंट' भविष्य

भूक ही माणसाची प्राथमिक गरज आहे. कष्ट ही माणसाला नको असलेली झंझट आहे. भूक भागवणं आणि कष्ट कमी करणं यापायी माणसानं बहुतांश शोध लावलेत. शेती हा एकमेव असा व्यवसाय आहे, ज्यामध्ये जगाची भूक भागवली जाते आणि अतोनात कष्ट शेतकऱ्याच्या वाट्याला येतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर शेतीमध्ये करण्याचे जे प्रयोग जगभर सुरू आहेत, त्यामागे ही नैसर्गिक जाणीव कारणीभूत असावी. माणूस मशिन वापरायला लागून जमाना लोटला. औद्योगिक क्रांतीला अडीचशे वर्षे होऊन गेलीत. उत्पादन निर्मितीसाठी माणसांएेवजी मशिनचा वापर हे औद्योगिक क्रांतीचं प्रमुख वैशिष्ट्य होतं. शारीरिक काम करण्याच्या क्षमतेला मर्यादा पडतात हे उत्क्रांतीच्या टप्प्यांमध्ये माणसाला उमगत गेलं. छोट्या-छोट्या गोष्टी एकत्र करून त्यापासून काही एक जुगाड जमवून कष्ट हलके करायचा उद्योग उत्क्रांतीच्या काळात माणसानं करून पाहिला. विहिरीवर रहाट बसवण्यापासून ते रथ वगैरे गोष्टी बनवणं कष्ट हलके करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग होता. माणसाचा पृथ्वीवरचा वावर जरी साठ लाख वर्षांचा असला, तरी माणसांच्या टोळ्यांची निर्मिती आणि टोळ्यांच्या स्थिरावण्यातून नागरीकरणाची निर्मिती अलीकडच्या सहा हजार वर्षांची प्रक्रिया आहे. नागरीकरण अंगवळणी पडल्यानंतर कष्ट हलके करण्याच्या माणसाच्या उद्योगानं बाळसं धरलं. निसर्गात सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंचा वापर करून कष्ट कमी करण्याचा प्रयत्न सर्वांत आधी झाला. त्यानंतर निसर्गात लपलेले धातू शोधून ते वापरायला माणसानं सुरवात केली. औद्योगिक क्रांतीपर्यंतच्या काळात सोनं, चांदी, तांबं, शिसं, पोलाद वगैरे धातू माणसानं वापरून पाहिले होते. त्यापासून वस्तू निर्माण करून त्या वापरून कष्ट हलके करायला सुरवात केली होती. औद्योगिक क्रांतीच्या सुमारे शंभर वर्षांच्या काळात म्हणजे अठराव्या शतकाचा मध्य ते एकोणिसाव्या शतकाचा मध्य या काळात कष्ट हलके होण्याबरोबरच कमी काळात अधिक उत्पादनावर माणसानं भर दिला. शिवाय, कमी काळात जास्त अंतर कापायचा प्रयत्नही याच काळात करून पाहिला गेला. आधी शोधून ठेवलेले धातू वापरून किचकट अशा मशिन्सची निर्मिती केली गेली. या मशिन्सनी कष्ट कमी केलेच; शिवाय अंतरही घटवली. कमी वेळात अधिक आणि विविध प्रकारचं उत्पादन होऊ लागलं.  औद्योगिक क्रांतीचा स्पर्श झाला नाही, असं जीवनाचं एकही अंग शिल्लक राहिलं नाही. एकट्या 'होमो सॅपियन'ला टोळीत आणि टोळीला नागरीकरणाकडं नेणाऱ्या शेती क्षेत्रालाही औद्योगिक क्रांतीनं किमान जमिनीच्या पृष्ठभागावर तरी बदलवून टाकलं. नांगर राहिले; जोडीला ट्रॅक्टर आले. नैसर्गिक बियाणं कमी-अधिक टिकली; जोडीला हायब्रीड आली. कृमी-कीटक राहिले; जोडीला कीटकनाशकं आली. हातानं खुरपणी राहिली; जोडीला प्लकिंग मशिन्स आली. पेरणी जमिनीतच होतेय; मात्र पेरणी यंत्र                    आली.   (अधिक वाचा ॲग्रोवन दिवाळी अंकात)

याशिवाय.... संकल्पनात्मक लेख

  •  टोळीराज्य आणि बळी : अतुल देऊळगावकर 
  •  शेतीचं ‘इंटेलिजंट’ भविष्य : सम्राट फडणीस
  •  प्रयोगशाळेत बनताहेत मांस, दूध अन् अंडी : सतीश कुलकर्णी
  •  जीएम तंत्रज्ञानाचे अडखळलेले पाऊल : डॉ. सी. डी. मायी
  •  मॉन्सूनचे भवितव्य : डॉ. रंजन केळकर
  •  कॉर्पोरेट फार्मिंग आणि रोबोट युगाची नांदी : मनोज कापडे  
  • अनुभव 

  • कोरडवाहू दुष्टचक्र आणि माझे म्हशीपालनाचे प्रयोग : महारुद्र मंगनाळे
  • धांडोळा

  • भविष्याच्या पोटात शेतकऱ्यांसाठी अमाप संधी : राजेंद्र जाधव   
  • भविष्यातली शेती असावी पर्यावरण अनुकूल : डॉ. नीलेश हेडा   
  • ग्रामीण भारतासाठी अलीबाबाची गुहा : उदय अ. देशमुख   
  • पर्माकल्चर...एक आनंदी प्रयोग : डॉ. मयूरा बिजले  
  • मुलाखती 

  • कॉर्पोरेट फार्मिंग नव्हे; समूह शेती हेच भविष्य : विलास शिंदे  
  • इनोव्हेशन हीच भविष्याची गुरुकिल्ली :  प्रा. अनिल गुप्ता  
  • ललित 

  • कथा 
  • नवस : द. ता. भोसले   
  • लाल सावट : सुभाष किन्होळकर  
  • ललित लेख 

  • व्हिलेज डायरी : आकाश चटके   
  • आठवणीतली दिवाळी - कल्पना दुधाळ  
  • तुमी मॅडम कशाला झाल्या कायनू? : भाऊसाहेब चासकर  
  • माझ्या सिनेमाची गोष्ट : राजकुमार तांगडे
  • कविता

  • व्यंग्यचित्रे
  • राशिभविष्य
  • ​(अंक सर्वत्र उपलब्ध, विक्रेत्याकडे संपर्क साधावा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com