agriculture news in Marathi, agrowon, do not ignore us says Prakash Ambedkar | Agrowon

आमच्या नादाला लागू नका : अॅड. प्रकाश आंबेडकर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 मार्च 2018

मुंबई : ‘आमच्या नादाला लागू नका’ असा इशारा देतानाच संभाजी भिडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी पाठीशी घालत आहेत, असा थेट आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत केला.

मुंबई : ‘आमच्या नादाला लागू नका’ असा इशारा देतानाच संभाजी भिडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी पाठीशी घालत आहेत, असा थेट आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत केला.

संभाजी भिडे यांना अटक करावी, या मागणीसाठी सोमवारी (ता. २६) विधानसभेवर एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मोर्चासमोर अतिशय जोशपूर्ण भाषण करताना अॅड. आंबेडकर यांनी मोदी आणि फडणवीस सरकारवर कडाडून हल्ला चढविला. ते म्हणाले, की देशात हुकूमशाही चालू देणार नाही. आमच्या नादाला लागू नका, असे स्पष्ट करतानाच हिटलरने देखील आत्महत्या केली होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

अॅड. आंबेडकर यांनी टीका करतानाच संभाजी भिडेंना पाठीशी घालू नये, आठ दिवसांत अटक करा, अन्यथा सरकारने याचे गंभीर परिणाम भोगायला तयार राहावे, असा इशाराही त्यांनी दिला. मोर्चा जिजामाता उद्यान ते विधान भवनदरम्यान काढण्यात आला असून, एल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती.

एल्गार परिषदेचे विधानसभेत पडसाद
कोरेगाव-भीमाप्रकरणातील संभाजी भिडे पत्रकार परिषदा घेत आहेत. मात्र राज्य सरकारला ते सापडत नाहीत. यावरून राज्य सरकार भिडेंना पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत केला. कोरेगाव-भीमाप्रकरणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता.

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...