agriculture news in Marathi, agrowon, Do water works; Otherwise leave a job | Agrowon

जलयुक्तची कामे करा; अन्यथा नोकरी सोडा
टीम अॅग्रोवन
रविवार, 25 मार्च 2018

सांगली  ः जिल्ह्यातील पाणीटंचाई मिटविण्यासाठी जलयुक्त शिवार योजना उपयुक्त ठरणार आहे. तरीही अनेक अधिकारी जलयुक्तची कामे गांभीर्याने घेत नसल्याने गेल्या वर्षीची कामे अजून सुरू आहेत. ही गंभीर बाब असून, पाणी प्रश्‍न मिटविण्यासाठी अधिकाऱ्यांनी योगदान द्यावे. जे अधिकारी काम करणार नाहीत, त्या अधिकाऱ्यांनी नोकरी सोडून घरी जावे, अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी दिला.

सांगली  ः जिल्ह्यातील पाणीटंचाई मिटविण्यासाठी जलयुक्त शिवार योजना उपयुक्त ठरणार आहे. तरीही अनेक अधिकारी जलयुक्तची कामे गांभीर्याने घेत नसल्याने गेल्या वर्षीची कामे अजून सुरू आहेत. ही गंभीर बाब असून, पाणी प्रश्‍न मिटविण्यासाठी अधिकाऱ्यांनी योगदान द्यावे. जे अधिकारी काम करणार नाहीत, त्या अधिकाऱ्यांनी नोकरी सोडून घरी जावे, अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता. २३) दोन वर्षांतील कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. २०१५-१६ या वर्षातील तब्बल २५७ कामे अपूर्ण असून, त्यात कृषी विभागाची जबाबदारी १७९ कामांची आहे. छोटे पाटबंधारे विभागाची १६, तर लघू पाटबंधारेची १५ कामे अपूर्ण आहेत. सातत्याने सूचना देऊनही कामे का होत नाहीत ज्या दहा ठिकाणी पाणीसाठे आहेत, ती वगळून २४७ कामे मार्चअखेर मार्गी लागलीच पाहिजेत, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. 

काम करणे जमत नसेल तर नोकरी सोडा आणि तेही जमत नसेल तर मला सांगा, मी बंदोबस्त करतो, अशा शब्दांत त्यांनी कानउघाडणी केली. या दिरंगाईमुळे एका वरिष्ठ अधिकाऱ्याला थेट बदलीला सामोरे जावे लागले होते. त्यानंतरही यंत्रणा सुस्त असल्याचे आढावा बैठकीत स्पष्ट झाले. 

२०१७-१८ या वर्षात तब्बल सात हजार ९५१ कामे नियोजित आहेत. त्यावर एकूण ९९ कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यातून सात हजार ३४८ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ही संख्या राज्यात सर्वाधिक असल्याचा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केला. केवळ ५९१ कामांना मान्यता बाकी असून, तीही एप्रिलपर्यंत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यात ग्रामपंचायत विभागाकडे ३६१, महसूलकडे २००, कृषीकडे २७, वन विभागाकडे दोन कामांची मंजुरी आहे. एकूण कामांपैकी दोन हजार ६७८ कामे सुरू आहेत. एक हजार ४९१ पूर्ण झाली आहेत. एक हजार २७२ प्रगतिपथावर आहेत. एकूण चार कोटी ६९ लाखांचा खर्च झाला आहे. ही कामे मे महिनाअखेरीस पूर्ण झाली पाहिजेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. 

टंचाईमुक्तीचा बोऱ्या 
२०१७-१८ या वर्षात १४० गावे टंचाईमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी केवळ चार गावे टंचाईमुक्त झाली आहेत. नऊ गावांत ८० टक्‍क्‍यांवर काम झाले आहे. २४ गावांत ५० टक्के, तर तीन गावांत ३० टक्के कामे झाली आहेत. १०० गावांमध्ये कामे प्राथमिक अवस्थेत आहेत. त्याला जबाबदार यंत्रणांना धारेवर धरण्यात आले.

`रोहयो'चा निधी तुंबतोच कसा? 
रोजगार हमी योजनेचा निधी तुंबतोच कसा, असा जाब विचारत जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ निधी मंजूर करण्याच्या सूचना दिल्या. त्याला विलंब झाला तर पगारातून दंड कापला जाईल, असा इशाराही देण्यात आला. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अपर जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, कृषी अधिकारी राजेंद्र साबळे, `रोहयो' उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी आदी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...