agriculture news in Marathi, agrowon, Drought relief for 2017 villages in Parbhani and Nanded districts | Agrowon

परभणी, नांदेड जिल्ह्यांतील २०१७ गावांना दुष्काळाच्या सवलती
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 मार्च 2018

परभणी : २०१७-१८ च्या खरीप हंगामातील पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आलेल्या परभणी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांतील ८४९ गावांना आणि नांदेड जिल्ह्यातील १० तालुक्यांतील १,१६८ गावांना अशा दोन जिल्ह्यांतील एकूण २०१७ गावांना दुष्काळी भागासाठी असलेल्या सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जवसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीजबिलात सूट आदी सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.

परभणी : २०१७-१८ च्या खरीप हंगामातील पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आलेल्या परभणी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांतील ८४९ गावांना आणि नांदेड जिल्ह्यातील १० तालुक्यांतील १,१६८ गावांना अशा दोन जिल्ह्यांतील एकूण २०१७ गावांना दुष्काळी भागासाठी असलेल्या सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जवसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीजबिलात सूट आदी सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.

परभणी जिल्ह्यामध्ये एकूण ८५३ गावांपैकी बलसा (ता. परभणी) या गावाचे कृषी क्षेत्र विद्यापीठासाठी तर करजखेडा (ता. सेलू), चौधरणी खुर्द, लिंबाळा (ता. जिंतूर) या गावांचे कृषी क्षेत्र धरणासाठी संपादित झाल्यामुळे एकूण ८४९ गावे पैसेवारीसाठी पात्र आहेत. परभणी जिल्ह्यातील एकूण लागवडीयोग्य क्षेत्र ५ लाख ८३ हजार ३७८ हेक्टरपैकी २०१७-१८ खरीप हंगामात ५ लाख ५१ हजार २४ हेक्टवर पेरणी झाली, तर ३२ हजार ४४३.९५ हेक्टर क्षेत्र नापेर (पडिक) राहिले होते. जिल्ह्यात सरासरी ५४६ मिलिमीटर म्हणजेच वार्षिक सरासरीच्या ७०.३ टक्के पाऊस झाला. त्यामुळे मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, बाजरी पिकांच्या उत्पादनात मोठी  घट आल्याचे पीक कापणी प्रयोगावरून स्पष्ट झाले. 

गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीच्या उत्पादनात मोठी घट आली. परिमाणी जिल्ह्याची अंतिम पैसेवारी सरासरी ४३.६७ पैसे आली. अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आलेल्या गावांमध्ये परभणी तालुक्यातील १३१, जिंतूर तालुक्यातील १६९, सेलू तालुक्यातील ९४, मानवत तालुक्यातील ५४, पाथरी तालुका ५८, सोनपेठ तालुक्यातील ६०, गंगाखेड तालुक्यातील १०६, पालम तालुक्यातील ८२, पूर्णा तालुक्यातील ९५ असे नऊ तालुक्यांतील ८४९ गावांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी बुधवारी (ता. २१) या गावांमध्ये दुष्काळाच्या सवलतीसह विविध उपाययोजनांची अमंलबजावणी करण्याचे आदेश दिले.

कमी पावसामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील १६ पैकी १० तालुक्यातील १,१६८ गावांची खरिपाची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली. या गावांमध्ये जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी विविध सवलती लागू करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये माहूर तालुक्यातील ९२, किनवट तालुक्यातील १९१ हदगाव तालुका १४५, हिमायतनगर तालुक्यातील ६४, देगलूर तालुक्यातील १०८, नायगाव ८९, बिलोली तालुक्यातील ९१, मुखेड तालुक्यातील १३५,कंधार तालुक्यातील १२६, लोहा तालुक्यातील १२७ गावांचा समावेश आहे. 

परभणी जिल्ह्यातील ८४९ आणि नांदेड जिल्ह्यातील १,१६८ अशा दोन जिल्ह्यांतील एकूण २,०१७ गावांमध्ये दुष्काळग्रस्त असलेल्या सवलती लागू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनातर्फे विविध विभागांना देण्यात आले आहेत.

५० पैशांपेक्षा कमी पैसवारी आलेल्या
गावांना देण्यात येणाऱ्या सवलती

 जमीन महसुलात सूट  सहकारी कर्जाचे पुनर्गठन  शेतीशी निगडित कर्जाची वसुली  कृषिपंपाच्या वीज देयकात ३३.५ टक्के सूट  शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी  रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता  आवश्यक तेथे पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी टॅंकर  टंचाई जाहीर केलेल्या गावांत शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज जोडणी खंडित न करणे

इतर ताज्या घडामोडी
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ...
बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...