नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली निफाड साखर कारखान्याची जागा १०५ कोटींना खरेदी करण्याची तयारी जवाहरलाल नेहरू पोर्ट अर्थात जेएनपीटीने दाखवली आहे. या प्रस्तावाला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मान्यता दिली असून, जेएनपीटी ड्रायपोर्ट उभे राहण्यासाठी निफाड कारखान्याच्या पडीक जागेच्या बदल्यात जिल्हा बँकेला मुद्दल देण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. त्यामुळे जिल्हा बँकेला साखर कारखान्याच्या थकबाकीपैकी १०५ कोटी रुपये मिळणार आहे.

मुंबई येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत जेएनपीटीचे नीरज बन्सल, डॉ. प्रशांत पाटील, ज्येष्ठ नेते सुरेश बाबा पाटील, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन निफाडचे प्रांत महेश पाटील आदी उपस्थित होते.

औद्योगिक आणि शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर असणाऱ्या नाशिक येथे सुमारे ८०० कोटी रुपये खर्चून ड्रायपोर्ट उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय दळणवळण व रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी केली. याकरिता निफाड सहकारी साखर कारखान्याची जमिनीची आवश्यकता आहे.

कर्जबाजारीपणामुळे बंद अवस्थेत असलेल्या निफाड साखर कारखान्याकडे १०० ते १५० एकर जागा आहे. परंतु या कारखान्याकडे जिल्हा बँकेचे १५९ कोटीचे कर्ज असून, वनटाइम सेटलमेंट करून १२९ कोटी रुपये रक्कम होते. १०५ कोटी मुद्दल कारखान्याने घेऊन विषय मार्गी लावावा यातून बँकेची रक्कमही मिळेल व ड्रायपोर्टसुद्धा लवकरात लवकर उभा राहील, असा प्रस्ताव मांडण्यात आला.

या प्रस्तावाला बँकेने १०५ कोटी रुपये मुद्दल घेऊन उर्वरित २४ कोटींचा बोजा बँकेवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जेएनपीटी ड्रायपोर्टचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र, १२९ कोटींपैकी उर्वरित २४ कोटी रुपयांचा बोजा, मात्र बँकेवर कायम राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. बन्सल यांनी कारखान्याच्या जमिनीचे मूल्यांकन आधार समजून घेतले व मान्यता दिली. सदर प्रस्ताव जेएनपीटी बोर्डाच्या व मिनिस्ट्रीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

निसाकाकडे १५९ कोटींचे कर्ज थकीत आहे. वनटाइम सेटलमेंट करून ही रक्कम १२९ कोटी रुपये होते. कारखान्याची मालमत्ता बँकेकडे गहाण आहे. कारखाना परिसरातील १०८ एकर जागेच्या बदल्यात जेएनपीटीने १०५ कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून, उर्वरित २९ कोटी रुपयांंचा बोजा बँकेवर कायम राहणार आहे. - केदा आहेर, अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com