दक्षिण आफ्रिकेतील स्टेल्लेनबाऊच विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ कॉर्नेली मिन्नार यांनी कीटकां
ताज्या घडामोडी
अमरावती ः खरेदी केलेल्या मालाच्या साठवणुकीसाठी गोदाम नसल्याच्या कारणामुळे हरभरा खरेदी थांबविण्यात आली आहे. परिणामी १५६५ नोंदणीकृत हरभरा उत्पादकांच्या खरेदीचे काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
अमरावती ः खरेदी केलेल्या मालाच्या साठवणुकीसाठी गोदाम नसल्याच्या कारणामुळे हरभरा खरेदी थांबविण्यात आली आहे. परिणामी १५६५ नोंदणीकृत हरभरा उत्पादकांच्या खरेदीचे काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
वरुड येथे शासनाने विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून मार्च महिन्यांत तूर, हरभरा खरेदीस सुरवात केली. वरुड तालुक्यात हरभरा विक्रीसाठी १९९८ शेतकऱ्यांनी खरेदी-विक्री संघाकडे रीतसर प्रक्रिया पूर्ण करून नोंदणी केली. खरेदीची गती संथ असल्याने आजवर यापैकी केवळ ४३६ शेतकऱ्यांचा ५ हजार ३२७ क्विंटल ५० किलो इतकाच हरभरा खरेदी होऊ शकला. अद्याप नोंदणीकृत १५६५ शेतकऱ्यांचा हरभरा वेटिंगवर आहे.
राज्यभरात हरभरा साठवणुकीसाठी गोदाम नसल्याने खरेदी थांबविण्यात आल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली. नाफेडने ४ हजार ४०० रुपये क्विंटल दराने हरभरा खरेदीस सुरवात केली. दरम्यान सुरवातीच्या काळात व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची आर्थिक निकड पाहता ३ हजार रुपये क्विंटलने हरभरा खरेदी केला. आता हाच हरभरा ओळखीच्या शेतकऱ्यांच्या सातबारावर नोंदणी करून शासनाला ४ हजार ४०० रुपये क्विंटलने विकल्या जात असल्याची चर्चा आहे. एकाच सातबारावर हरभरा, तूर, कपाशी, सोयाबीन, ज्वारी अशा पिकाच्या नोंदी असताना त्याच शेतात १० ते १५ क्विंटल हरभरा उत्पादन होते तरी कसे, असा प्रश्न चर्चीला जात आहे.
- 1 of 351
- ››