agriculture news in marathi, agrowon, educon2017 | Agrowon

उच्चशिक्षण क्षेत्रासमोरच्या आव्हानांवर चिंतन
सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

भारतातील विद्यापीठे बदलांच्या आव्हानाला सामोरे जात असताना सिंगापूरमध्ये होणारे हे विचारमंथन उपयोगी ठरेल असा मला विश्‍वास वाटतो.
- प्रतापराव पवार, "अध्यक्ष', सकाळ

पुणे ः भारतातील उच्चशिक्षण क्षेत्रासमोरच्या आव्हानांबरोबरच उच्चशिक्षण क्षेत्रात आवश्‍यक असणाऱ्या बदलांवर चर्चा घडवून आणणाऱ्या "एज्युकॉन 2017' परिषदेला शुक्रवारपासून (ता. 8) सिंगापूर येथे सुरवात होत आहे.

उच्चशिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्र आणून उच्चशिक्षण क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या विविध मुद्द्यांवर चर्चा घडवून नव्या दिशा शोधण्याचा प्रयत्न करणारी ही परिषद "सकाळ माध्यम समूह' गेल्या बारा वर्षांपासून आयोजित करीत आहे.

"उच्चशिक्षण क्षेत्रासमोरील बदलांचे आव्हान' ही यंदाच्या "एज्युकॉन'ची संकल्पना आहे. "सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या उपस्थितीत आज (शुक्रवारी) सकाळी ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्‍निकल एज्युकेशनचे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्रबुद्धे यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन होणार आहे.

परिषदेतील चर्चासत्रांनंतर सर्व प्रतिनिधी सिंगापूर येथील नानयांग टेक्‍नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीलाही भेट देणार आहेत. गेल्या वर्षी इस्राईलमधील तेल अविव येथे "एज्युकॉन' परिषद घेण्यात आली होती. "इनोव्हेशन ऍण्ड आंत्रप्रेन्युअरशिप' अशी या परिषदेची संकल्पना होती.

या आधी कार्लस्‌ऱ्हू (जर्मनी), पॅरिस (फ्रान्स), इस्तंबूल (तुर्कस्तान), शांघाय (चीन), कोलंबो (श्रीलंका), दुबई आदी परिषदांमध्ये देशातील शिक्षणतज्ज्ञांनी उच्चशिक्षणाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्याबरोबरच त्या त्या देशांमधील नामवंत विद्यापीठांना, तसेच उद्योगांशी संबंधित संस्थांना भेटी दिल्या होत्या.

एज्युकॉनची तपपूर्ती
शिक्षण, तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रांमधल्या तज्ज्ञांना एकत्र आणून त्यांच्यात संवाद घडवण्यासाठी "सकाळ माध्यम समूहा'ने बारा वर्षांपूर्वी "एज्युकॉन' ही राष्ट्रीय कुलगुरू परिषद भरविण्यास सुरवात केली.

यंदा "एज्युकॉन'ची तपपूर्ती होत असताना या परिषदांनी देशातल्या उच्चशिक्षण क्षेत्रात स्वतःचे एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे. आतापर्यंत झालेल्या परिषदांमधून उच्चशिक्षण आणि उद्योग यांच्यातील परस्पर सहकार्याचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे.

आज परदेशी विद्यापीठांबरोबर खासगी विद्यापीठेही स्पर्धेत उतरली आहेत. या पार्श्‍वभूमीवर दर्जेदार, कालसुसंगत आणि उत्पादक शिक्षणासाठी पारंपरिक विद्यापीठांनी बदलणे गरजेचे आहे. "एज्युकॉन'च्या आयोजनामागे ही भूमिका आहे.

"बदलांचे आव्हान' ही यंदाच्या वर्षी सिंगापूरमध्ये होणाऱ्या "एज्युकॉन'ची मध्यवर्ती कल्पना आहे. सिंगापूरमधील उच्चशिक्षण क्षेत्राने गेल्या दोन दशकांमध्ये यशस्वीपणे या बदलांचा मागोवा घेतला आहे, असे प्रतापराव पवार (‘अध्यक्ष', सकाळ) यांनी सांगितले.

उच्चशिक्षणाच्या गुणवत्तेविषयी वेगळा दृष्टिकोन देणाऱ्या "सकाळ एज्युकॉन'ने शिक्षण क्षेत्रात आपले स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. सिंगापूरने गेल्या दोन दशकांच्या कालावधीत उच्चशिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडवून आणले आहेत.

शिक्षण संस्थांची स्वायत्तता, मूल्यांकन, प्राध्यापकांची गुणवत्तावाढ, अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्यातून सिंगापूरने हा बदल घडवून आणला आहे. यातील काही बदलांबाबतही या परिषदेत चर्चा होणार आहे, असे डॉ. संजय धांडे (अध्यक्ष, नियामक मंडळ, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग, माजी संचालक, आयआयटी, कानपूर) यांनी स्पष्ट केले.

या विषयांवर होणार चर्चा

  • भारतातील शिक्षणपद्धतीतील परिवर्तन
  • शिक्षण संस्थांची स्वायत्तता आणि मूल्यांकन,
  • पायाभूत आणि डिजिटल सुविधा
  • कौशल्यविकास आणि शिक्षण
  • अध्यापक आणि विकास
  • सिंगापूर प्रयोग
  • आंतरराष्ट्रीय सहकार्य
  • अध्ययन आणि अध्यापनाचे मूल्यमापन
     

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील लघू प्रकल्प आले २७ टक्‍क्...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८६४ लघू, मध्यम, मोठ्या...
गारपीटग्रस्त केळी बाग सुधारणेच्या...अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे  केळी पिकाचे कमी-...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १५...नांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
जळगाव जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात...जळगाव  : जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प यंदा सहा...
ब्रॉयलर्स बाजार दहा रुपयांनी उसळला,...ब्रॉयलर्सचा बाजार अपेक्षेप्रमाणे जोरदार उसळी...
पुण्यात कलिंगड, खरबुजाच्या आवकेत वाढपुणे : गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये...
'मॅग्नेटिक महाराष्ट्र'चे आज उद्‌घाटनमुंबई : राज्याच्या औद्योगिक वाढीसाठी उपयुक्त ठरणा...
उत्तम निचऱ्याच्या जमिनीत पपई लागवड...पपई फळपिकाच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची जमीन...
जमिनीतील जिवाणूंच्या गुणसूत्रीय रचनांचा...जमीन ही पिकाचे उत्पादन घेण्यासाठी एकमेव परिपूर्ण...
तुटपुंजी मदत नको, शंभर टक्के भरपाई द्या...अकोला : गारपिटीने नुकसान झालेल्या...
ग्रामीण भागातील अतिक्रमित घरे नियमित...मुंबई : ग्रामीण महाराष्ट्रातील शासकीय जमिनींवरील...
राज्यातील २६ रेशीम खरेदी केंद्रे बंदसांगली ः कमी गुंतवणूक, खात्रीशीर व कायमची...
शिवनेरीवर उद्या शिवजन्मोत्सव सोहळापुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त...
नगर जिल्ह्यात सव्वातीन हजार हेक्‍टरवर...नगर : नगर जिल्ह्यामध्ये महाबीजतर्फे गहू, ज्वारी,...
बदलत्या वातावरणाचा केळीला फटका जळगाव : हिवाळ्याच्या शेवटच्या कालावधीत विषम...
‘ग्रामस्थांचा विरोध असेल तर नाणार...मुंबई : कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या...
आपले सरकारचे संगणकचालक सात...मुंबई : ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान...
जाहीर केलेला हप्ता द्या ः राजू शेट्टीकोल्हापूर : कोल्हापुरातील साखर कारखान्यांनी जाहीर...
औरंगाबाद येथे हमीभावाने शेतमाल...औरंगाबाद (प्रतिनिधी) : शेतीमालाची शासनानेच ठरवून...
सत्तर वर्षे होऊनही शेतकऱ्यांच्या...राळेगणसिद्धी, जि. नगर : देशाला स्वतंत्र...