अंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घट

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

विटा, जि. सांगली  : वाढती उष्णतेची झळ पोल्ट्री उद्योगाला बसू लागली आहे. उष्णतेमुळे अंडी उत्पादनावर परिणाम झाला आहे. खानापूर तालुक्‍यात दररोजचे एक लाख अंडी उत्पादन घटले आहे. त्यामुळे पोल्ट्रीधारकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. 

खानापूर तालुका व विट्यात शंभरावर पोल्ट्री शेड आहेत. चौदा-पंधरा लाख अंड्यांवरील कोंबड्या आहेत. दररोज बारा लाख अंड्यांचे उत्पादन होते. उन्हाच्या झळांनी व कोंबड्या कमी खाद्य खातात. त्यामुळे दररोजचे उत्पादन एक लाख अंड्यांनी घटले आहे. पोल्ट्रीधारकांनी उन्हापासून कोंबड्यांच्या संरक्षणासाठी शेडमध्ये स्प्रिंकलर (पाण्याचे फवारे) बसवलेत. शेडमध्ये कोंबड्यांना गारवा मिळतो. फॉगरही बसवलेत. शेड आतून पत्र्याला रंग लावले जात आहेत. कोंबड्यांना पिण्यासाठी तात्पुरता पाणीसाठा आहे. 

महिन्यापूर्वी दोन रुपये साठ पैसे प्रति अंडे दर होता. दरातही वाढ झाली आहे. सध्या तीस पैसे कमिशन वजा जाता साडेतीन रुपये दर पोल्ट्रीधारकांना मिळत आहेत. आता दर चांगला आहे. वाढत्या उन्हाने अंडी उत्पादनात घट होत आहे. कोंबड्यांची मरही वाढली आहे. कोंबडी खाद्य तयार करण्यास लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर मात्र स्थिर आहेत. पण उष्णतेने कोंबड्यांची घालमेल वाढली आहे.   

वाढत्या उष्णतेपासून कोंबड्यांच्या संरक्षणासाठी शेडमध्ये पाण्याचे फवारे बसवलेत. शेडमध्ये गारवा आहे. कोंबड्यांची मर थोडीफार होते. दररोज अंडी उत्पादनावर सरासरी पाच टक्के परिणाम झाला आहे. - शत्रुघ्न जाधव, पोल्ट्री व्यावसायिक, विटा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com