agriculture news in Marathi, agrowon, Excavation will reveal the thrilling history of Raigad | Agrowon

उत्खननातून रायगडचा रोमांचकारी इतिहास उलगडणार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 31 मार्च 2018

पुणे : रायगड किल्ले संवर्धन आणि विकास या अंतर्गत हाेणाऱ्या उत्खननातून राेमांचकारी इतिहासाबराेबरच किल्ल्याबाबतचा अाख्यायिका आणि गूढ गाेष्टींबाबतचे वास्तव समाेर येणार आहे. यासह गडावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक बाबीदेखील उजेडात येतील, असा विश्‍वास डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. 

पुणे : रायगड किल्ले संवर्धन आणि विकास या अंतर्गत हाेणाऱ्या उत्खननातून राेमांचकारी इतिहासाबराेबरच किल्ल्याबाबतचा अाख्यायिका आणि गूढ गाेष्टींबाबतचे वास्तव समाेर येणार आहे. यासह गडावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक बाबीदेखील उजेडात येतील, असा विश्‍वास डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. 

रायगड प्राधिकरणाच्या वतीने रायगड किल्ले आणि संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहेत. या संवर्धन प्रकल्पाचा सर्वात माेठा भाग असणाऱ्या उत्खनातून लाेपलेला इतिहासावर संशाेधन हाेणार आहे. यासाठी प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजी महाराज यांच्या सूचनेनुसार डेक्कन काॅलेजच्या वतीने ९ संशाेधक आणि संशाेधक विद्यार्थ्यांच्या वतीने किल्ल्यावर उत्खनन सुरू करण्यात आले आहे. 

उत्खननामध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेल्या वास्तूंचा शाेध घेण्यात येत असून, गडावरील प्रत्येक भग्न अवशेषांचे उत्खनन केले जाणार आहे. यासाठीचा आराखडा डेक्कन कॉलेजच्या वतीने करण्यात येत आहे. उत्खननाच्या प्रारंभीच्या टप्प्यात पायऱ्या संपल्यानंतर डाव्या बाजूला असणाऱ्या चाैथऱ्याच्या परिसरातील उत्खनन गेल्या १५ दिवसांपासून सुरू आहे, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले. 

उत्खननाबाबत बाेलताना डॉ. शिंदे म्हणाले, ‘‘या उत्खननामध्ये मातीच्या भांड्याचे अवशेष, शिवकाली तांब्याची नाणी, काचेचे तुकडे, इमारतीचे स्ट्रक्चर, पाटा, उखळ, खिळे, कड्या, कुलूप, लाकडी खांब उभे केलेले दगड, भिंतीमध्ये लाकडी खांबाचे साचे सापडले आहेत. या विविध अवशेषांचे पृथक्करण आणि विश्लेषण करुन इतिहास उजेडात येणार आहे. 

‘रायगड ताेफांच्या माऱ्यांनी जाळला ही अख्यायिका सांगितली जाते. मात्र, याबाबतचा पुरावा मिळालेला नाही. उत्खननामध्ये याबाबतचे काही पुरावे मिळाल्यानंतरच यावर भाष्य करता येईल.’
- डॉ. वसंत शिंदे, कुलगुरू, डेक्कन कॉलेज, पुणे 
 

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...