agriculture news in Marathi, Agrowon exhibition will start from today in sangali, Maharashtra | Agrowon

‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन आजपासून सांगलीत
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 जानेवारी 2018

सांगली  ः नेचर केअर फर्टिलायझर प्रस्तुत ‘ॲग्रोवन’ कृषी प्रदर्शनाचे उद्‍घाटन शुक्रवारी (ता. ५) सकाळी अकरा वाजता शेतकऱ्यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी नेमिनाथनगर येथील कल्पद्रूम क्रीडांगणावर जय्यत तयारी झाली आहे. मे. बी. जी. चितळे आणि चितळे जिनस एबीएस इंडिया प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत. आधुनिक शेती करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती हमखास मिळण्यासाठी ‘ॲग्रोवन’ कृषी प्रदर्शन सकाळी १० ते ७ या वेळेत शेतकऱ्यांसाठी खुले खुले असणार आहे.

सांगली  ः नेचर केअर फर्टिलायझर प्रस्तुत ‘ॲग्रोवन’ कृषी प्रदर्शनाचे उद्‍घाटन शुक्रवारी (ता. ५) सकाळी अकरा वाजता शेतकऱ्यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी नेमिनाथनगर येथील कल्पद्रूम क्रीडांगणावर जय्यत तयारी झाली आहे. मे. बी. जी. चितळे आणि चितळे जिनस एबीएस इंडिया प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत. आधुनिक शेती करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती हमखास मिळण्यासाठी ‘ॲग्रोवन’ कृषी प्रदर्शन सकाळी १० ते ७ या वेळेत शेतकऱ्यांसाठी खुले खुले असणार आहे.

महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवणाऱ्या ‘ॲग्रोवन’ने सतत नावीन्याचा ध्यास धरताना शेतकऱ्यांना सतत एक पाऊल पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रदर्शनांमधून शेतीचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळात असून, या प्रदर्शनांतून शेतकऱ्यांना प्रेरणा मिळते. नवनवीन तंत्रज्ञान, खते, औषधे, अवजारे, यंत्रसामग्रीचे स्टॉल प्रदर्शनात आहेत. ट्रॅक्‍टर्स, हार्वेस्टिंग यंत्रे, विविध प्रकारची अवजारे, कापणी यंत्रे, जैविक कीटकनाशके, विद्राव्य खते, ग्रीन हाउस टेक्‍नॉलॉजी आणि इप्लिमेंटस्‌, बियाणे उत्पादक, टिश्‍यूकल्चर, ठिबक व तुषार सिंचन, पॅकेजिंग आणि कोल्ड स्टोअरेज उद्योजक, ग्रेडिंग, वेइंग, सॉर्टिंग अवजारे उत्पादक कंपन्या, बॅंका व कृषी शिक्षण संस्था, कृषी साहित्य प्रकाशन, कृषी संशोधन संस्था व शासनाचे विविध विभाग सहभागी झाले आहेत.

प्रदर्शनांतून शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, अवजारांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध आहे. पशुधनाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. दरम्यान, द्राक्ष, डाळिंब, ऊस, केळी, हळद या नगदी पिकांच्या लागवडीविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मिळणार आहे. द्राक्ष, डाळिंब निर्यातीबाबत मागर्दर्शन होणार आहे. सांगली, सोलापूर, कर्नाटकचा सीमाभाग, कोल्हापूर, सातारा, कऱ्हाड जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

चर्चासत्र
शुक्रवार (ता. ५)    

दुपारी १२ ते २  श्री. गुणवंत गरड, (निर्यातक्षम डाळिंब तज्ज्ञ)  आणि श्री. राजाराम यलपल्ले-पाटील (प्रगतिशील शेतकरी)    फळ लागवड व निर्यातक्षम डाळिंब उत्पादन तंत्रज्ञान
 
 दुपारी ३ ते ५   श्री. नीलेश मालेकर, (वरिष्ठ शास्त्रज्ञ कल्याणी गोरक्षण ट्रस्ट संचालित कृषी विज्ञान केंद्र, कालवडे, कराड)    पीकवाढीचे तंत्र आणि मंत्र

शनिवार (ता. ६)    
दुपारी १२ ते २  श्री. सुरेश माने-पाटील (माजी शास्त्रज्ञ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी पुणे)  भरघोस उत्पन्नवाढीसाठी ऊस पिकाचे व्यवस्थापन
    

दुपारी ३ ते ५  श्री. मनोज वेताळ (उपविभागीय कृषी अधिकारी, मिरज)  शेतीबाबतच्या शासकीय योजना

रविवार (ता. ७)  
दुपारी १२ ते २    श्री. एन. बी. म्हेत्रे (द्राक्ष तज्ज्ञ, तासगाव)  द्राक्षबागेसाठी जमिनीचे व्यवस्थापन
    
दुपारी ३ ते ५ श्री. डॉ. राहुल गुप्ता, (सरव्यवस्थापक चितळे जिनस एबीएस इंडिया)    दुधाळ जनावरांच्या प्रजाती व आदर्श गोठा व्यवस्थापन
 

इतर अॅग्रो विशेष
संत एकनाथ महाराज समाधी दर्शनासाठी...पैठण, जि. औरंगाबाद : पैठण येथील शांतीब्रह्म श्री...
शेतीतील दारिद्र्याचे भीषण वास्तवभारताने खुली व्यवस्था स्वीकारल्याला २०१६ मध्ये २५...
आश्वासक हरभरा; अस्वस्थ उत्पादकराज्यात हरभरा काढणीस महिनाभर आधीपासूनच सुरवात...
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड...सांगली  ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम...
ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द,...
कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात...वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील...
राज्यात अद्यापही २४ टक्के ‘एफआरपी’ बाकीपुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना...
उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशाननवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘...नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव...
उन्हाचा ताप वाढण्याची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा...
जेजुरी गडावर देवाची रंगपंचमीजेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...