agriculture news in Marathi, agrowon, Explicit type of subsidy disclosed by fake proposals | Agrowon

बनावट प्रस्तावांद्वारे ठिबकचे अनुदान लाटण्याचे प्रकार उघड
टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 मार्च 2018

परभणी : जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत परभणी, पूर्णा, मानवत तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या शेतावर ठिबक संच न बसविता केवळ अनुदान लाटण्यासाठी बनावट बिलासह कृषी विभागाकडे ५३ प्रस्ताव सादर केल्याचे पडताळणीदरम्यान उघडकीस आले आहे. 

याप्रकरणी संबंधित वितरकांवर नोंदणी रद्दची कारवाई करण्यात आली. या संबधित शेतकऱ्यांची ई-ठिबक प्रणालीतील प्रस्ताव नोंदणी रद्द करण्यात आली. अशा प्रकारचे आणखी काही गैरप्रकार उघडीस येण्याची शक्यता आहे. 

परभणी : जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत परभणी, पूर्णा, मानवत तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या शेतावर ठिबक संच न बसविता केवळ अनुदान लाटण्यासाठी बनावट बिलासह कृषी विभागाकडे ५३ प्रस्ताव सादर केल्याचे पडताळणीदरम्यान उघडकीस आले आहे. 

याप्रकरणी संबंधित वितरकांवर नोंदणी रद्दची कारवाई करण्यात आली. या संबधित शेतकऱ्यांची ई-ठिबक प्रणालीतील प्रस्ताव नोंदणी रद्द करण्यात आली. अशा प्रकारचे आणखी काही गैरप्रकार उघडीस येण्याची शक्यता आहे. 

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत २०१७-१८ मध्ये ठिबक सिंचन संच अनुदासाठी जिल्ह्यातून एकूण १९ हजार ४५३ प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यापैकी पूर्वसंमतीनंतर ३७१ प्रस्ताव, मोका तपाणीनंतर ८३ प्रस्ताव, खरेदीची बिले सादर न केल्यामुळे ५,४७१ प्रस्ताव रद्द करण्यात आले.

त्यामुळे एकूण १३ हजार ५२८ प्रस्ताव अनुदान प्रक्रियेसाठी उपलब्ध झाले. त्यापैकी १० हजार प्रस्तावांना पूर्वसंमती देण्यात आली. त्यापैकी ४,०६२ प्रस्ताव अनुदानासाठी पात्र करण्यात आले असून, संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे.

काही प्रस्तावांची फेरतपासणी केली असता, शेतकऱ्यांच्या शेतावर ठिबक संच न बसविता बनावट बिलासह प्रस्ताव सादर करण्याचे प्रकार उघडीस आले आहेत. बनावट प्रस्तावामध्ये पूर्णा तालुक्यातील चुडावा, हिवरा बु., धोत्रा, रूपला या गावांतील शेतकऱ्यांचे १५ प्रस्ताव, परभणी तालुक्यातील मांगनगाव, इटलापूर (दे.) या गावातील १२ प्रस्ताव, मानवत तालुक्यातील नागरजवळा, खडकवाडी, पिंपळा, पाळोदी या गावांतील २६ प्रस्तावांचा समावेश आहे. या गावांतील शेतकऱ्यांना ठिबक संचाचा पुरवठा करण्यासाठी उत्पादक कंपनीकडून वितरकाने ठिबक संचाचे साहित्य घेतलेले नाही.

सादर केलेल्या बिलावरील जीएसटी नंबर जुळत नाही. संबंधित शेतकऱ्यांचे आधार कार्ड, बॅंक पासबुकची प्रत जोडलेली आहे; परंतु प्रस्तावांवर एकाच व्यक्तीने शेतकरी; तसेच साक्षीदार शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. याप्रकरणी मानवत येथील वितरकांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. वसमत येथील वितरकास नोटीस पाठविण्यात आली आहे. अन्य वितरकांवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित शेतकऱ्यांची ई-ठिबक प्रणालीतील प्रस्ताव नोंदणी रद्द करण्यात आली आहे. मोका तपाणीनंतर शंका आल्यामुळे पडताळणी केली असता, हे गैरप्रकार उघडकीस आले. प्रस्तावांचे चावडी वाचन केले जाणार आहे. त्यामुळे केवळ अनुदानासाठी सादर करण्यात आलेले बनावट प्रस्ताव उघडीस येतील, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. आर. शिंदे यांनी सांगितले.

इतर बातम्या
साखरेच्या गोळ्याही करतील वेदना कमीवाढत्या स्थौल्यत्वासारख्या व त्या अनुषंगाने...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
कडधान्याची कमी दरात सर्रास खरेदीजळगाव ः जिल्ह्यातील जळगाव, चोपडा, पाचोरा,...
राज्यातील विकास सोसायट्यांना रिक्त...सांगली ः राज्यातील विकास सोसायट्यांची संख्या २१...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
पुण्यात एक ऑक्टोबरला ‘कृषी कल्चर’ ज्ञान...पुणे ः शेतीमधील बदलत्या तंत्रावर प्रकाश टाकणारा...
पावसाच्या तुरळक हजेरीने हलका दिलासापुणे: पावसाच्या दीर्घ खंडानंतर राज्यात दोन...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या...
पोटॅशचा मोठा तुटवडाजळगाव  ः रेल्वेकडून खत पुरवठादार किंवा खत...
कीडनाशकांबाबतच्या याचिकेची सर्वोच्च...नवी दिल्ली ः मानवी आरोग्याला धोकादायक व भारतात...
राज्यात उद्यापासून पावसाचे संकेतपुणे: बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी...
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
जळगाव जिल्ह्यात तुरळक पाऊसजळगाव ः जिल्ह्यात सोमवारी (ता. १७) सकाळी ८ पर्यंत...
महाराष्ट्रात भावांतर योजना लागू...परभणी ः शेती एवढ्या समस्या कुठेच नाहीच. सर्व...