लाळ्या-खुरकूतप्रकरणी चौकशी समितीस मुदतवाढ

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : गाई-म्हशी व शेळ्या-मेढ्यांच्या लाळ्या-खुरकूत आजारावरची लस खरेदी प्रक्रिया रखडवल्याप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीला राज्य सरकारने ५ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्यातील सुमारे २ कोटी १० लाख जनावरांचा लाळ-खुरकूत रोगापासून बचाव व्हावा यासाठी दरवर्षी गाय, बैल, म्हशींना राज्य सरकारकडून लस देण्यात येते. जनावरांना वर्षातून दोनदा ही लस दिली जाते.

मात्र, मागील वर्षभरात लसीकरणासाठी सात वेळा निविदा काढूनही जनावरांना लस मिळाली नव्हती. सातव्या निविदेत पशुसंवर्धन विभागाने बायोव्हेट प्रा.लि. या कंपनीकडून ही लस खरेदी केली. देशात फक्त मे. इंडियन इम्युलॉजिकल्स कंपनी, बायोव्हेट प्रा.लि. आणि ब्रिलियन्स बायो फार्मा, बेंगलोर या तीनच कंपन्या या लसीची निर्मिती करतात. यावरून अर्थसंकल्पी अधिवेशनात विरोधकांनी ‘पदूम’मंत्री महादेव जानकर यांच्यावर थेट आरोप करत त्यांना धारेवर धरले होते. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची आक्रमक मागणीही केली होती. 

दरम्यान, याप्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने अप्पर मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी समिती नेमली होती. आता या समितीला ५ मेपर्यंतची मुदतवाढ दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com