agriculture news in Marathi, agrowon, The extension of the loan waiver scheme up to April 14 | Agrowon

कर्जमाफी योजनेला १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 एप्रिल 2018

कोल्हापूर  : राज्यात कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा अर्ज करण्यासाठी शासनाने १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. वन टाइम सेटलमेंटसाठीसुद्धा ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिल्याचा आदेश शासनाने शनिवारी (ता. ३१) सायंकाळी काढला. हा आदेश काढल्यानंतर तातडीने याबाबतची माहिती राज्यातील जिल्हा बॅंकांना कळविण्यात आली आहे.

कोल्हापूर  : राज्यात कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा अर्ज करण्यासाठी शासनाने १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. वन टाइम सेटलमेंटसाठीसुद्धा ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिल्याचा आदेश शासनाने शनिवारी (ता. ३१) सायंकाळी काढला. हा आदेश काढल्यानंतर तातडीने याबाबतची माहिती राज्यातील जिल्हा बॅंकांना कळविण्यात आली आहे.

सायंकाळी उशिरा आदेश निघाल्याने अद्याप सेवा सोसायट्यांपर्यंत हे आदेश आले नसले तरी सोमवारी (ता. १) त्यांना याबाबत अधिकृत माहिती कळविली जाईल, असे जिल्हा बॅंकांच्या सूत्रांनी सांगितले. २८ जूनला ही योजना जाहीर झाल्यानंतर टप्प्याने यासाठी मुदत वाढविली आहे.

या योजनेत ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत वाढविलेली होती. एकवेळ समझोता योजना (वन टाईम सेटलमेंट) साठीही हाच कालावधी होता. परंतु सध्या खरिपाच्या तयारीत शेतकरी असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासनाने दोन्ही योजनांच्या तारखा वाढविल्या. यापैकी वन टाईम सेटलमेंटसाठी तीन महिन्यांच्या कालावधीत वाढ करताना शासनाने ही मुदत ३० जून २०१८ पर्यंत वाढविली आहे.

काही कारणाने अद्यापही या योजनेत सहभागी नसलेले शेतकरीही यात सहभागी व्हावेत हा या मागचा उद्देश असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. मार्च एडिंगच्या गडबडीत असलेल्या जिल्हा बॅंकांना सायंकाळी उशिरा याबाबतचा आदेश प्राप्त झाला. याची अंमलबजावणी आता सोमवारपासून सुरू होण्याची शक्‍यता असल्याचे बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

कर्जमाफीच्या योजनेत वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी मुदत वाढविल्याचा शासन आदेश शनिवारी (ता. ३१) सायंकाळी प्राप्त झाला आहे. यानुसार आता पुढील कार्यवाही होईल.
- सुधीर काटे, सहायक व्यस्थापक, सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंक
 

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...