agriculture news in Marathi, agrowon, farmer Can get separate transformer | Agrowon

शेतकऱ्यास ५० हजार रुपयांत स्वतंत्र रोहित्र मिळणार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 एप्रिल 2018

जळगाव  : राज्यातील शेतकऱ्यांना अखंडितपणे दहा ते बारा तास वीज मिळण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू होणार आहे. यातून जो शेतकरी ५० हजार रुपयांपर्यंत खर्च करू शकेल, त्याला स्वतंत्र रोहित्र दिले जाणार असल्याची माहिती भुसावळ (जि. जळगाव) येथील औष्णीक वीज प्रकल्पातील वरिष्ठांनी दिली आहे. तसेच सद्यःस्थितीत शेतकऱ्यांची स्थिती नाजूक असल्याने शेतकऱ्यांनी थकबाकी भरली त्वरित भरल्यास शेतकऱ्यांच्या बिलावरील दंड, व्याज माफ केले जाईल, असेही स्पष्ट केले आहे. 

जळगाव  : राज्यातील शेतकऱ्यांना अखंडितपणे दहा ते बारा तास वीज मिळण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू होणार आहे. यातून जो शेतकरी ५० हजार रुपयांपर्यंत खर्च करू शकेल, त्याला स्वतंत्र रोहित्र दिले जाणार असल्याची माहिती भुसावळ (जि. जळगाव) येथील औष्णीक वीज प्रकल्पातील वरिष्ठांनी दिली आहे. तसेच सद्यःस्थितीत शेतकऱ्यांची स्थिती नाजूक असल्याने शेतकऱ्यांनी थकबाकी भरली त्वरित भरल्यास शेतकऱ्यांच्या बिलावरील दंड, व्याज माफ केले जाईल, असेही स्पष्ट केले आहे. 

भुसावळ ६६०० मेगावॉट क्षमतेच्या औष्णिक वीज प्रकल्पाचे भूमिपूजन, विविध ठिकाणच्या वीज उपकेंद्राच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम शुक्रवारी (ता.३०) ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार एकनाथ खडसे आदींच्या उपस्थितीत झाले. यानिमित्त ज्या योजना शासनाने शेतकऱ्यांसाठी आणल्या आहेत, त्याची माहिती दिली गेली. 

नवे प्रदूषणविरहित प्रकल्प सुरू करण्याचे केंद्र व राज्य शासनाने ठरविले आहे. ‘भेल’ कंपनीने दीपनगरचा हा प्रकल्प घेऊन शासनास ९०० कोटींचा लाभ मिळवून दिला आहे. प्रकल्पग्रस्तांना स्थानक स्तरावर रोजगार प्रकल्पात देण्याबाबत ‘भेल’च्या अधिकाऱ्यांशी शासनाने चर्चा केल्याची माहिती देण्यात आली. प्रत्येक शेतकऱ्याला ट्रान्स्फॉर्मर शेतकऱ्यांना विकास अखंडित वीज व पाणी मिळाले तरच होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू होईल.

त्यासाठी गावागावात आम्ही सौर ऊर्जेचे पॅनल लावू. लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघातील पडीक जमिनी, गावरान जमिनीवर सौर पॅनल लावण्यासाठी त्या जागा शासनाला उपलब्ध करून द्याव्यात. यामुळे गावागावात वीजनिर्मिती होईल. जो शेतकरी पन्नास साठ हजार खर्च करू शकेल त्याला स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर दिला जाईल. राज्यात सर्व पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना या सौर ऊर्जेवर चालविण्यात येतील, असेही सांगण्यात आले आहे.

नवनवीन प्रकल्प उभारत असताना चोपडा तालुक्‍यातील आदिवासी पाड्यात स्वातंत्र्यानंतर वीज नव्हती. तेथे सौर ऊर्जा निर्माण करून आदिवासीच्या घरात वीज पोचविली आहे. नवीन प्रकल्पासाठी जागा गरजेची असते. जागा देण्यासाठी विरोध होता कामा नये, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

इतर बातम्या
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
म्हसवडच्या छावणीतील झोपड्यांत...म्हसवड, जि. सातारा : भीषण दुष्काळामुळे चारा व...
`बोकटेतील बंधाऱ्यात पाणी सोडा`नाशिक : येवला, मनमाड व ३८ गावे पाणीपुरवठा...
सांगलीतील प्रकल्पांत अवघा ११ टक्के...सांगली ः ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर जिल्ह्यातील लघु...
निवडणूक काळातही मिळणार ‘सन्मान'नागपूर  : शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये...
काटोल पोटनिवडणुकीला अंतरिम स्थगिती नागपूर : काटोल विधानसभा पोटनिवडणुकीला मुंबई उच्च...
मातेरेवाडीत द्राक्षबाग कोसळून लाखोंचे...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील मातेरेवाडी येथील...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
‘पोक्रा’आचारसंहितेच्या कचाट्यातनांदुरा, जि. बुलडाणा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
नगर जिल्ह्यात टॅंकरचा आकडा...नगर : गतवर्षी पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात...
मराठवाड्यात २९ लाख जनता टॅंकरवर अवलंबून औरंगाबाद : मराठवाड्यातील २९ लाख ७२ हजार ५५२...
कृष्णा खोऱ्यात पाणी देण्यासाठी...कोयनानगर, जि. सातारा ः शासनाने कोयना धरणाच्या...
दिव्‍यांग मतदारांना केंद्रावर मूलभूत...पुणे ः मतदान केंद्रावर दिव्‍यांग मतदारांना (पीपल...
परभणीत कैरी प्रतिक्विंटल ३००० ते ४५००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...