त्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.
बातम्या
अकोला : शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत २०१६-१७ मध्ये उत्पादित केलेल्या बियाण्यास उत्पादन आणि वितरणासाठीचे अनुदान शासनाकडून मिळत नसल्याने अार्थिक अडचणीत सापडलेल्या कंपनी संचालकांनी ३१ मार्चला कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या खामगाव येथील घरासमोर अात्मदहन करण्याचा इशारा दिला अाहे. यासंदर्भात गुरुवारी (ता.२२) वाशीम जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.

शेतकरी उत्पादक कंपन्यांची शासनाच्या नियम व प्रोत्साहनानुसार स्थापना करण्यात अाली. प्रत्येक कंपनीत दोनशे ते अडीचशे भागधारक सभासद अाहेत. अशा कंपन्यांच्या माध्यमातून वाशीम जिल्ह्यात २०१६-१७ च्या हंगामात शेतकरी कंपन्यांनी बियाणे उत्पादित केले. यासाठी पूर्वीपासून अनुदानाचे पाठबळ शासन देत होते. तयार झालेले बियाणे शेतकऱ्यांना कमी दरात तसेच खात्रीशीर मिळण्याची सोय झाली होती. मात्र २७ एप्रिल २०१७ ला निघालेल्या शासन अादेशानुसार शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी असलेले अनुदान बंद करण्याचा निर्णय घेण्यात अाला.
बियाणे उत्पादनाची प्रक्रिया ही एक वर्षाअगोदर सुरू होते. २०१६-१७ मध्ये बीजोत्पादन केलेले बियाणे २०१७-१८ मध्ये तयार झाले. त्यामुळे या तयार झालेल्या बियाण्यास अनुदान मिळणे अपेक्षित होते. परंतु शासनाच्या निर्णयानंतर हे अनुदान मिळण्याची अपेक्षा संपुष्टात अाली.
या निर्णयाचा शेतकरी कंपन्यांना मोठा अार्थिक फटका बसला. संपूर्ण अार्थिक नियोजन कोलमडले अाहे. २०१६-१७ मध्ये उत्पादन केलेल्या ९ हजार क्विंटल बियाण्यास २ कोटी २५ लाख रुपये उत्पादन अनुदान तर एक कोटी १७ लाख रुपये बियाणे वितरण अनुदान दिल्या गेले. अशा स्वरूपात गेल्या काही हंगामापासून शेतकरी कंपन्यांना पाठबळ मिळत होते. त्यामुळे कंपन्या पुढाकार घेत दर्जेदार बियाणे उत्पादनासाठी पुढाकार घेऊ लागल्या. हे बियाणे उत्पादन करण्यासाठी मोठी गुंतवणूक केली. अाता शासनाने अनुदान देण्याचे टाळल्याने कंपन्या अार्थिकदृष्ट्या मोठ्या अडचणीत सापडल्या अाहेत. वाशीम जिल्ह्यात १८ उत्पादक कंपन्या /गट/ मंडळे असून त्यांचे बियाणे उत्पादन थांबले अाहे.
शासनाने अनुदान न दिल्यास शनिवारी (ता. ३१) खामगाव येथे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निवासस्थानासमोर सामूहिकरित्या अात्मदहन करणार असल्याचा संत ज्ञानेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी तसेच बालाजी शेतकरी उत्पादक गटाचे (किनखेडा) पंजाबराव अवचार, बाळनाथ कंपनीचे (बाळखेड) विलास गायकवाड आदींनी इशारा दिला अाहे.
- 1 of 564
- ››