agriculture news in Marathi, agrowon, The farmer filed case against Insurance Company | Agrowon

बियाणे, विमा कंपनीविरुद्ध शेवगावला पोलिसांत फिर्याद
टीम अॅग्रोवन
रविवार, 25 मार्च 2018

नगर ः ‘बीटी कापूस वाणाची लागवड केल्यास हे वाण कोणत्याही अळीला बळी पडत नाही अशी जाहीरात केली. त्यामुळे मी बीटी कापसाची लागवड केली. मात्र पिकांवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने माझे ८० टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे माझी फसवणूक झाली असून कापूस बियाणे कंपनी व विमा कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार राहुल मालुसरे यांनी केली आहे. त्यांनी शेवगाव (जि. नगर) येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

नगर ः ‘बीटी कापूस वाणाची लागवड केल्यास हे वाण कोणत्याही अळीला बळी पडत नाही अशी जाहीरात केली. त्यामुळे मी बीटी कापसाची लागवड केली. मात्र पिकांवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने माझे ८० टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे माझी फसवणूक झाली असून कापूस बियाणे कंपनी व विमा कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार राहुल मालुसरे यांनी केली आहे. त्यांनी शेवगाव (जि. नगर) येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

कापसावर बोंड आळी पडल्याने नुकसान झाले, मात्र सरकार मदत देण्यात टाळाटाळ करत असल्याने मालुसरे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ‘कापसाचे चांगले बियाणे असून त्याची लागवड केली तर  बोंड अळीसह कोणत्याही अळीचा प्रादुर्भाव होत नाही. शिवाय एकरी पंधरा ते वीस क्विंटल उत्पादन निघते अशी सतत जाहिरात केली. त्यामुळे मी या जाहिरातीवर विश्‍वास ठेवून तीस पाकिटे माझ्या शेतात लावले. मला एक एकर कापसाचे उत्पादन घेण्यासाठी मशागत, बियाणे, खते, मजुरी व विम्यासह पंचवीस हजारांच्या जवळपास खर्च आला. मात्र बोंड अळी पडल्याने ८० टक्के नुकसान झाले. 

याबाबत मी तालुका कृषी अधिकारी व तहसीलदारांना चार महिन्यांपूर्वी लेखी पत्र दिले आहे. मी सहा हेक्‍टर ३३ गुंठ्याचा पंतप्रधान पीक विमा घेतला होता. त्यापोटी साडेबारा हजार रुपयाचा हप्ताही भरला. मात्र विमा कंपनीकडूनही त्यांच्याकडूनही विमा मदत मिळाली नाही. 

माझी फसवणूक झाली असून विमा कंपनी व कापूस बियाणे कंपनी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी फिर्याद मालुसरे यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. फिर्याद देऊन तीन दिवसांचा कालावधी झाला तरी गुन्हा दाखल नाही. कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल करायचा हे पोलिस तपासात असल्याचे सांगण्यात आले. 

इतर बातम्या
साताऱ्यात उत्साहात मतदानसातारा  : जिल्ह्यात मंगळवारी लोकसभा...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
फळबागा तोडण्याची शेतकऱ्यांवर वेळजवळगाव, जि. बीड ः दुष्काळी परिस्थितीने...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...