शेतकरी आत्महत्या तपासाबाबत नवे परिपत्रक
मारुती कंदले
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

शेतकरी कुटुंबाला तातडीने मदत देण्यासाठी आत्महत्येच्या कारणांचा लवकरात लवकर शोध घेणे आवश्‍यक आहे. त्यासाठी पोलिसांनी तातडीने हा तपास पूर्ण करावा यासाठी गृह खात्याने नवे परिपत्रक जारी केले आहे.

मुंबई : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मदत मिळण्यात होत असलेली दिरंगाई टाळण्यासाठी राज्य सरकारने नवीन परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार आत्महत्येच्या प्रकरणांचा तपास पोलिस उपनिरीक्षक व त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून आठ दिवसांत पूर्ण करण्यात यावा, असे निर्देश गृह खात्याकडून देण्यात आले आहेत.

सततची नापिकी, दुष्काळ आणि इतर नैसर्गिक संकटे, शेतमाल दरातील अभाव आदी कारणांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येतात. परिणामी हंगामासाठी आणि इतर घरगुती बाबींसाठी घेतलेल्या कर्जांची वेळेवर परतफेड होत नाही. आर्थिक गरजेपोटी शेतकऱ्यांना अनेकदा खासगी सावकारांपुढे हात पसरावे लागतात.

त्यांच्याकडील व्याजाचा दरही मोठा असतो. या आर्थिक दुष्टचक्रात अडकलेले शेतकरी शेवटी मृत्यूला कवटाळतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारपुढे आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारकडून विविध प्रयत्न होत आहेत.

फडणवीस सरकारने वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनअंतर्गत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, त्याला म्हणावे यश येताना दिसत नाही. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून एक लाख रुपयांची मदत दिली जाते. मात्र, चौकशीतील कालापव्यामुळे बाधित कुटुंबाला मदत मिळण्यात खूपच दिरंगाई होते.

घरातील कर्ता पुरुष गमावल्यानंतर बाधित कुटुंबाची आर्थिक परवड होते. मुलांचे शिक्षण आदींसह इतर बाबींवर त्याचा गंभीर परिणाम होतो. त्या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी आणि मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांच्यात झालेल्या बैठकीत मदत मिळण्यातील दिरंगाई टाळण्यासाठी निर्णय घेण्यात आला.

अशा आहेत महत्त्वपूर्ण बाबी

  • शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणांचा तपास आठ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना.
  • तपास पोलिस उपनिरीक्षक किंवा त्यावरील उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून पूर्ण करावा.
  • पोलिस निरीक्षक अथवा पोलिस सहायक निरीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधितांना मार्गदर्शन करावे.
  • अशा प्रकरणात न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेने दोन दिवसात अहवाल सादर करावा.
  • केलेल्या कारवाईचा अहवाल विनाविलंब जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचे निर्देश.

 

इतर अॅग्रो विशेष
खुल्या शेतीतील गुलाब लागवड तंत्रज्ञान गुलाबाच्या फुलांचा उपयोग...
ज्ञानाचा प्रकाशदिवाळी... प्रकाशाचा, उत्साहाचा सण! सारी दुखं...
साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ४...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...जळगाव ः जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...
पोषक तत्त्वांनीयुक्त खजूर, अक्रोड, काजूपोषक तत्त्वे आणि आरोग्याच्या दृष्टीने अक्रोड अाणि...
रब्बी हंगामासाठी कांदा जाती अन्‌...महाराष्ट्रात रब्बी कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या...
बाजरी चारा पीक लगवड तंत्रज्ञान बाजरी हे पीक पालेदार, रसाळ, गोड व मऊ असते....
जळगाव जिल्ह्यात दादर ज्वारी तरारली जळगाव  ः खानदेशात यंदा परतीच्या पावसामुळे...
कांद्यावर डिसेंबरपर्यंत 'स्टॉक लिमिट'नवी दिल्ली : नफेखोरपणा, साठेबाजी, वाढते दर आणि...
सांगली जिल्ह्यात भाजपच्या वारुला ब्रेकसांगली ः लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत...
कर्जमाफी योजनेस प्रारंभ...राज्य सरकारची...मुंबई : कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या...
वाढत्या लोकसंख्येसाठी व्हर्टिकल फार्म...भारतासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या देशांसाठी...
निशिगंध लागवड तंत्रज्ञान निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात....
बरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...
‘जीवनसंगिनी’ची प्रकाशवाटनैसर्गिक आपत्तींचा कहर आणि अनिश्चित बाजार अशा...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचेरब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
नेताओं की दिवाली, किसानों का दिवालादोन दिवसांपूर्वी मला अमरावती जिल्ह्यातील शेतकरी...
ऊसावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन तपशील : पूर्व मशागत     कीड...