दक्षिण आफ्रिकेतील स्टेल्लेनबाऊच विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ कॉर्नेली मिन्नार यांनी कीटकां
बातम्या
मुंबई : धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूप्रकरणानंतर मंत्रालयासमोर आणखी एका व्यक्तीने शुक्रवारी (ता. २३) आत्महत्येचा प्रयत्न करण्याची घटना घडली आहे. ५० वर्षीय गुलाब मारुती शिंगारी असे त्यांचे नाव आहे. शिंगारी यांचा हेतू लक्षात आल्यानंतर तत्काळ हस्तक्षेप करत मरीन ड्राईव्ह पोलिसांनी शिंगारी यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे त्यांचा जीव वाचला असला तरी झालेल्या प्रकारामुळे मंत्रालय पुन्हा थरारले आहे.

आत्मदहनाचा प्रयत्न करणारे गुलाब शिंगारी हे मूळचे लासलगावचे आहेत. पोलिस पाटील आणि जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर अवैधरित्या कब्जा केल्याचा आरोप गुलाब शिंगारी यांनी केली आहे. याबाबत न्याय मिळावा, या मागणीसाठी ते मंत्रालयात आले होते. मात्र, त्यांनी नैराश्यातून अंगावर रॉकेल ओतून आत्महत्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शिंगारी यांनी नेमके कोणत्या कारणासाठी असा प्रयत्न केला याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे उशिरापर्यंत त्यांच्याबद्दलची सविस्तर माहिती समजू शकली नाही.
मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने मंत्रालयीन कर्मचाऱ्यांमध्येही अस्वस्थता पसरली आहे. मंत्रालय सुरक्षा कर्मचाऱ्यांवरही या प्रकारांमुळे कामाचा ताण वाढत असल्याचे दिसून येते. १० नोव्हेंबर २०१७ रोजी तुळजापूर येथील ज्ञानेश्वर साळवे हा तरुण शेतकरी आत्महत्या करण्यासाठी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील छतावर चढला होता.
२२ जानेवारी २०१८ रोजी धुळे येथील धर्मा पाटील या ८४ वर्षीय शेतकऱ्याने मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेरच विषप्राशन करून आत्महत्या केली. तर २ फेब्रुवारी २०१८ रोजी मारुती धावरे या सोलापूर जिल्ह्यातील २८ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या करण्यासाठी कीटकनाशक घेऊन मंत्रालयात आला होता, परंतु त्याला पोलिसांनी गेटवर ताब्यात घेतले.
७ फेब्रुवारी २०१८ रोजी अविनाश शेटे या नगर जिल्ह्यातील तरुणाने मंत्रालयाबाहेर अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. ८ फेब्रुवारी २०१८ रोजी चेंबूरमधील हर्षल रावते या तरुणाने तुरुंगवासाची शिक्षा कमी करीत नाही म्हणून नैराश्य आल्याने थेट पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी सखूबाई विठ्ठल झाल्टे या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
- 1 of 571
- ››