आर्थिक मदतीची शेतकऱ्यांची मागणी
विनोद इंगोले
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

अमरावती : अकोला जिल्ह्यात कीड-रोग व अपुरा पाऊस यामुळे खरिपातील उडीद, मूग व सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. उत्पादकतेवर याचा परिणाम झाल्याची दखल घेत शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी भारतीय किसान संघाचे विभागीय सदस्य मधुकर सरप यांनी केली आहे.

अमरावती : अकोला जिल्ह्यात कीड-रोग व अपुरा पाऊस यामुळे खरिपातील उडीद, मूग व सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. उत्पादकतेवर याचा परिणाम झाल्याची दखल घेत शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी भारतीय किसान संघाचे विभागीय सदस्य मधुकर सरप यांनी केली आहे.

(कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले. त्यानुसार, अकोला जिल्ह्यात अपुरा पाऊस व कीड-रोगाचा प्रादुर्भाव झाल्याच्या परिणामी अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक हातचे गेले आहे. काही शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपायांच्या माध्यमातून काही प्रमाणात पीक वाचविले, तरी उत्पादकतेत मोठी घट होण्याची शक्‍यता आहे.

मूग, उडीद यांसारख्या पिकांच्या बाबतीतदेखील अकोला जिल्ह्यात अशीच स्थिती आहे. त्याची दखल घेत शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी कान्हेरी सरप (जि. अकोला) येथील मधुकर सरप यांनी केली आहे. खासदार संजय धोत्रे यांनादेखील या संदर्भाने निवेदन देण्यात आले. निवृत्ती सरप, शंकर इंगळे, निळकंठ शेळके, दीपक सरप, विठ्ठल सरप, संतोष ढवळे यांचाही निवेदनकर्त्यांमध्ये समावेश आहे.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात ३५ ते ४० हजार टन खते... जळगाव : जिल्ह्यात यंदाच्या खरिपात खतांचा मुबलक...
सोलापूर बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने...
उद्याेग जननी कमल पुरस्कारांचे वितरणपुणे : महिला बचत गटांनी आणि महिला शेतकऱ्यांनी...
देशातील खरीप पीक १०४९ लाख हेक्टरवर नवी दिल्ली ः देशातील खरीप पीक क्षेत्र गेल्या...
देशातील ९१ धरणांत ५९ टक्के पाणीसाठा नवी दिल्ली ः देशातील धरणांत ५९ टक्के पाणीसाठा ...
नगर, नाशिक जिल्ह्यांतून टोमॅटोची आवक... नाशिक : गत सप्ताहात राज्यातील टोमॅटो उत्पादक...
साताऱ्यात वांगी, टोमॅटोची आवक वाढली सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नागपुरात सरबती गहू २२०० ते २६०० रुपये... नागपूर ः येथील कळमना बाजार समितीत गत...
पितृपंधरवड्यामुळे सोलापुरात गवार, भेंडी... सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
धुळे, जळगाव जिल्ह्यातील हंगामी... जळगाव : धुळे व जळगाव जिल्ह्यांत हंगामी पैसेवारी...
कोल्हापूर बाजार समितीत फूल बाजार सुरू कोल्हापूर : येथील बाजार समितीत सोमवार (ता. १८)...
सातारा जिल्ह्यात ६५७ शेततळ्यांची कामे... सातारा : मागेल त्याला शेततळे योजनेस सातारा...
राज्यात आज पावसाचा अंदाजपुणे ः काेकण आणि गाेव्यात मंगळवारी (ता. १९) तुरळक...
डाळिंबावर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव सांगली : जिल्ह्यात मृग हंगामातील डाळिंबाचा बहर...
दर्जेदार डाळिंबासाठी जमिनीच्या...सोलापूर : डाळिंबाच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमीन...
उत्पादन खर्चात मोठी घट, पोल्ट्रीचा ‘...गेल्या महिनाभरात पोल्ट्री खाद्यासाठी लागणाऱ्या...
पुणे बाजार समितीत घाणीचे साम्राज्यपुणे : अाशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची बाजार...
शाहु महाराज, अंबाबाईचे दर्शन घेवुन... कऱ्हाड - घटस्थापनेदिवशी 21...
शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने शेती करावी :...परभणी : सरकार तसेच कृषी विद्यापीठे शेतकऱ्यांच्या...
‘गोकुळ’च्या अध्यक्ष बदलाच्या हालचालीकोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघाची (गोकूळ)...