agriculture news in Marathi, agrowon, Farmers engaged in arranging money for Kharif | Agrowon

खरिपासाठी पैशांची तजवीज करण्यात शेतकरी व्यस्त
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 मे 2018

अकोला  ः अागामी हंगामाला अाता अवघा महिनासुद्धा शिल्लक राहलेला नसून शेतकऱ्यांची विविध कारणांनी तगमग वाढली अाहे. प्रशासनाने हंगामाच्या दृष्टीने बियाणे, रासायनिक खतांचे नियोजन केले अाहे. बाजारपेठेत फेरफटका मारला असता अद्याप कुठल्याही पिकांच्या बियाण्याची खरेदीविक्री सुरू झालेली नव्हती. बियाणेसुद्धा अद्याप पुरेशा प्रमाणात वितरित झालेले नाही.

जिल्ह्यात या वर्षी ४ लाख ८२ हजार  ६०० हेक्टरच क्षेत्रचे नियोजन करण्यात अाले अाहे. मागील हंगामात कपाशीवर बोंड  अळीने धुमाकूळ घातल्याने सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात सुमारे १५ हजार हेक्टरची  वाढ अपेक्षित धरीत नियोजन करण्यात   अाले.

अकोला  ः अागामी हंगामाला अाता अवघा महिनासुद्धा शिल्लक राहलेला नसून शेतकऱ्यांची विविध कारणांनी तगमग वाढली अाहे. प्रशासनाने हंगामाच्या दृष्टीने बियाणे, रासायनिक खतांचे नियोजन केले अाहे. बाजारपेठेत फेरफटका मारला असता अद्याप कुठल्याही पिकांच्या बियाण्याची खरेदीविक्री सुरू झालेली नव्हती. बियाणेसुद्धा अद्याप पुरेशा प्रमाणात वितरित झालेले नाही.

जिल्ह्यात या वर्षी ४ लाख ८२ हजार  ६०० हेक्टरच क्षेत्रचे नियोजन करण्यात अाले अाहे. मागील हंगामात कपाशीवर बोंड  अळीने धुमाकूळ घातल्याने सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात सुमारे १५ हजार हेक्टरची  वाढ अपेक्षित धरीत नियोजन करण्यात   अाले.

यंदाच्या खरीप हंगामाला अत्यंत बिकट परिस्थितीत शेतकरी सामोरा जात अाहे. अकोला जिल्ह्यात कापूस व सोयाबीन हे प्रमुख पिके असून, यावर संपूर्ण अर्थकारण अवलंबून अाहे. गेल्या हंगामात या दोन्ही पिकांनी शेतकऱ्यांची निराशा केली. कमी पावसामुळे सोयाबीन उत्पादन घटले होते. तर कपाशीच्या पिकाचे बोंड अळीने ५० टक्क्यांपर्यंत नुकसान केल्याने शेतकरी पूर्णतः अार्थिक संकटात सापडला. शिवाय गेले वर्षभर कुठल्याही शेतमालाला चांगला दर मिळालेला नाही. हंगाम तोंडावर अाल्याने शेतीतील मशागतीची कामे सुरू झालेली अाहेत. प्रामुख्याने शेतकरी पहाटे व सायंकाळच्या सुमारास शेतातील काडीकचरा वेचणी, शेणखत टाकणे, ट्रॅक्टरने नांगरटी अादी कामे करण्यात व्यस्त अाहे.

कर्जवाटपाची गती संथ 
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने कर्जमाफी जाहीर केली. परंतु या माफीअंतर्गत शेतकऱ्यांचे खाते निल होऊनही तसे स्पष्ट कळत नसल्याने शेतकरी कर्ज मिळवण्यासाठी धडपडत अाहेत. जिल्ह्यात या वर्षी सुमारे १३०० कोटींपेक्षा अधिक कर्जवाटपाचे नियोजन अाहे. त्या तुलनेत अातापर्यंत २५ टक्केही पीक कर्जवाटप होऊ शकलेले नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून वाटपाची गती राखली जात असताना राष्ट्रीयीकृत बँकांकडून मात्र तळ्यात-मळ्यात धोरण ठेवले जात अाहे. जिल्ह्यात यामुळेच अद्याप १६२ कोटींचे पीक कर्जवाटप झालेले अाहे. अद्याप मोठा पल्ला गाठायचा अाहे.  

कपाशीत घटीची चिन्हे
व्यवस्थापनावरील खर्च वाढत असताना उत्पादनाची मात्र खात्री न राहल्याने शिवाय गेल्या मोसमातील बोंड अळीचा प्रकोप पाहता शेतकरी कपाशी पिकाकडे पाठ फिरवू शकतात. प्रशासनाने  जिल्ह्याच्या सरासरी दीड लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १ लाख २० हजार हेक्टरचे नियोजन केले अाहे. सुमारे ३० हजार हेक्टरने क्षेत्रात घट गृहीत धरली जात अाहे.  

बाजारात दाखल बियाणे
सध्या बाजारात ‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे २६ हजार क्विंटल, तर खासगी कंपन्यांचे ३५०० क्विंटल बियाणे दाखल असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विकास कार्यालयाने दिली. कपाशीची साडेपाच हजार पाकिटेसुद्धा अालेली अाहे. अद्याप मूग, उडीद व इतर बियाणे व खताची उपलब्ध केली जात अाहे.

शेतकरी प्रतिक्रिया
शासनाने कर्जमाफी दिली. परंतु त्याचे अद्याप काहीही झालेले  दिसत नाही. शेतकरी बँकांमध्ये फेऱ्या मारत अाहे. कर्जमाफीचे चित्र स्पष्ट व्हायला हवे. उन्हाळ्यात भुईमुगाचे पीक घेतल्याने खरिपासाठी अार्थिक पाठबळ भेटत होते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून भुईमूग पिकाने शेतकऱ्याकडे पाठ फिरवल्याने खरिपाचे पूर्ण नियोजन कोलमडून पडत अाहे. 
-हरिदास वनकर, बोर्डी, जि. अकोला

गेल्या वर्षी कपाशीची लागवड केली. मात्र आलेल्या बोंड अळीने कपाशी नेस्तनाबूत केले. गेल्या वर्षी ज्या पांढऱ्या सोन्याने तारायला पाहिजे त्याच पिकाने दारिद्र्यात नेले. त्यातच शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी अजूनही मिळाली नाही. बँकेत चौकशी केली असता आम्हाला कर्जमाफीची कोणतीच सूचना नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पैशांची मोठी समस्या अाहे. येणाऱ्या हंगामात कशाप्रकारे शेतीतील कामे करावी याची चिंता कुटुंबाला वाटत अाहे. 
- मुरलीधर अर्जुन खोणे, शेतकरी, दानापूर, जि. अकोला

बाजारपेठेत अातापर्यंत काही कंपन्यांचे कापूस बियाणे थोड्या प्रमाणात अाले अाहे. सोयाबीनचे बियाणे यायचे अाहे. दरवर्षी मे महिन्यात बियाणे विक्री व्यवसाय ३० टक्के व्हायचा. या वर्षी अातापर्यंत एक टक्कासुद्धा व्यवसाय नाही. शेतकऱ्यांकडून खरेदी तर दूर साधी चौकशीसुद्धा करण्यासाठी शेतकरी दुकानात अालेला नाही. सर्वच जण बियाणे व ग्राहकांच्या प्रतीक्षेत अाहेत.
- मोहन सोनोने, सचिव, अकोला जिल्हा कृषी विक्रेता संघ

खरिपाचे पीकनिहाय 
क्षेत्र नियोजन

सोयाबीन २१५०००
कापूस १२००००
मूग ३१०००
उडीद २८०००
तूर ६३५०००
ज्वारी २२५००
एकूण ४८२६००

 

इतर अॅग्रो विशेष
धन जोप्या पाऊस, पीक मरू देईना अन्‌ वाचू...झळा दुष्काळाच्या : जि, परभणी यंदा पावसात कसा जोर...
राज्यात सर्वदूर पाऊसपुणे ः राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (...
बेबाकी प्रमाणपत्राशिवाय राष्ट्रीय...मुंबई: पाऊस न पडल्याने आधीच त्रस्त असलेल्या...
मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर सर्वदूर पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर...
अजातशत्रूदेशाच्या राजकारणात आपल्या शालीन, सभ्य राजकारणाने...
बोंड अळी नियंत्रणासाठी...पुणे : राज्यात कपाशीतील बोंड अळीचे संकट वाढण्याची...
‘अटलपर्वा’चा अस्तनवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...
शेततळी झाली, शेती बागायती झालीसध्या राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
मध्यस्थविरहीत विक्री व्यवस्था उभी...अकोला येथे कार्यरत असलेल्या स्नातकोत्तर पशुवैद्यक...
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी कालवशनवी दिल्ली : प्रखर देशभक्त, भारतरत्न, माजी...
अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनकनवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून एम्स...
देशाचा विकास वेगाने होतोय : राष्ट्रपतीनवी दिल्ली : ''देशातील परिस्थिती झपाट्याने...
स्वातंत्र्य संग्रामातील ग्रामीण सहभागब्रिटिश सत्तेविरोधी स्वातंत्र्य चळवळीत केवळ शहरी...
सापळ्यात अडकलाय शेतकरीयावर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात बीटी कापसावर एक...
नाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...
पुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...
राज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...
शेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...
इथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...
सूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...