पीकविमा परताव्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण

परभणी ःपीकविमा परतावा मंजूर करण्यात यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (ता. ३०) गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे.
परभणी ःपीकविमा परतावा मंजूर करण्यात यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (ता. ३०) गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे.

परभणी ः गंगाखेड तालुक्यातील गुंजेगाव आणि राणीसावगरगाव मंडळामध्ये गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिकांचा विमा परतावा संपूर्ण जोखीमेसह मंजूर करण्यात यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. ३०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

गतवर्षी कमी पावसामुळे गंगाखेड तालुक्यातील गुंजेगाव, राणीसावरगाव मंडळातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला. सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली. पीकविमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना विमा कंपनीने तुटपुंजा विमा परतावा मंजूर केला. विमा संपूर्ण जोखीमेसह मंजूर करण्यात यावा या मागणीसाठी बालासाहेब मोटे, सदाशिव इमडे, अंगद मोटे, अनिरुद्ध मोटे आदी शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com