रस्त्यावर दूध ओतून केला सरकारचा निषेध

मोकळ ओहोळ, जि. नगर : दर घसरल्याने रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध करणारे शेतकरी.  (छायाचित्र ः विलास कुलकर्णी)
मोकळ ओहोळ, जि. नगर : दर घसरल्याने रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध करणारे शेतकरी. (छायाचित्र ः विलास कुलकर्णी)

नगर  : गेल्या सहा महिन्यांपासून दुधाचे दर सातत्याने कमी होत असल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मोकळ ओहोळ (ता. राहुरी) येथील दूध संकलन केंद्रासमोरच रस्त्यावर दूध ओतून मंगळवारी (ता. १७) सरकारचा निषेध केला. 

"सरकार शेतकऱ्यांचा अंत पाहत आहे. शेतीमालाला तर दर नाहीच, पण दूध धंदाही मोडीत काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे'' असे सांगत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. नगर जिल्ह्यामध्ये शेतीला जोड म्हणून दूध व्यवसायाला शेतकरी प्राधान्य देत आहेत.

दूध व्यवसायवाढीसाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे सांगत असले, तरी दुधाला दर मिळावा, यासाठी मात्र प्रयत्न करण्याऐवजी गेल्या सहा महिन्यांपासून दुधाचे दर वरचेवर खाली येत आहेत. त्यामुळे दूध धंदा मोडकळीस येत आहे. सोमवारी मोकळ ओहोळ (ता. राहुरी) येथील शेतकरी अर्जुन कदम, जालिंदर लहारे, सुभाष कदम, भारत तरवडे, विवेक गारकर, पोपट तरवडे हे शेतकरी नेहमीप्रमाणे दूध संकलन केंद्रावर दूध घेऊन आले.

त्या वेळी दूध संकलन केंद्रचालकाने दर कमी झाल्याचे सांगताच संतापलेल्या शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून संताप व्यक्त केला. "मागील सहा महिन्यांत २७ वरून २० रुपये लिटरपर्यंत दुधाचे दर घसरले आहेत. सरकार दूध धंदा मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे. सरकार शेतकऱ्यांचा अंत पाहत असल्याची टीका या वेळी शेतकऱ्यांनी केली.'' 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com