agriculture news in Marathi, agrowon, The farmers' rush to buy onion seeds continued | Agrowon

कांदा बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी कायम
टीम अॅग्रोवन
बुधवार, 30 मे 2018

राहुरी विद्यापीठ, जि. नगर  : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कांदा पिकाच्या खरीप वाणांची विक्री सोमवारी (ता. २८) सुरू झाली होती. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिल्याने कांद्याचे फुले समर्थ या वाणाची सर्वच्या सर्व ५६ क्‍विंटल व फुले बसवंत-७८० ची ९ क्विंटल बियाण्यांची विक्री करण्यात आली. यामधून सुमारे ५९ लाख रुपयांची कमाई झाली. दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. २९)देखील शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी गर्दी कायम होती. 
 

राहुरी विद्यापीठ, जि. नगर  : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कांदा पिकाच्या खरीप वाणांची विक्री सोमवारी (ता. २८) सुरू झाली होती. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिल्याने कांद्याचे फुले समर्थ या वाणाची सर्वच्या सर्व ५६ क्‍विंटल व फुले बसवंत-७८० ची ९ क्विंटल बियाण्यांची विक्री करण्यात आली. यामधून सुमारे ५९ लाख रुपयांची कमाई झाली. दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. २९)देखील शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी गर्दी कायम होती. 
 

मंगळवारी सकाळपासून सुमारे ५०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पुन्हा रांगेमध्ये व शांततेत बियाणे खरेदी केले. बियाणे फुले बसवंत-७८० केवळ १६ क्विंटल उरल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांस केवळ २ किलो बियाणे विक्री करण्याचे बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. मधुकर धोंडे यांनी आदेश दिले. मात्र यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून आली. कांदा बियाण्यांबरोबरच बियाणे विक्री केंद्रावर उडीद (टीएयूआय), मूग (वैभव), बाजरी (धनशक्ती व आदिशक्ती) या बियाण्यांची विक्रीदेखील सुरू होती. 

कांदा पिकाचा वाण फुले समर्थ : हलक्‍या जमिनीत ८५ ते ९० दिवसांमध्ये तयार होणारा खरीप पावसाळी हंगामासाठीचा वाण, आकर्षक गर्द लाल रंगाचा कांदा तयार होऊन हेक्‍टरी २०० ते २५० क्विंटल कांद्याचे उत्पन्न या वाणाचे मिळते. या वाणाची मागणी मोठ्या प्रमाणावर दिसून येते.

कांदा पिकाचा वाण फुले बसवंत-७८० : हलक्‍या व मध्यम जमिनीत ११० ते १२० दिवसांमध्ये तयार होतो. हा खरीप हंगामासाठीचा वाण असून, यापासून फिकट लाल रंगाचा कांदा तयार होऊन हेक्‍टरी २०० ते २५० क्विंटल उत्पन्न मिळते. 

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार

आम्ही परवापासून रांगेत उभे आहोत. आमच्यासमोर सोमवारी सर्व शेतकऱ्यांना ५ किलो बियाणे देण्यात आले. मात्र आज केवळ २ किलो बियाणे घेऊन काय करायचे, हे काय खासगी विद्यापीठ आहे काय, अधिकारी मनमानी कारभार कसा करतात असा संतप्त सवाल संगमनेर येथील गोरक्ष बागूल या कृषी पदवीधराने केला. बियाणे विभागाची तक्रार मुख्यमंत्र्याकडे करणार असल्याची माहिती त्याने दिली. 

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात उत्साहात मतदानसातारा  : जिल्ह्यात मंगळवारी लोकसभा...
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...