मशरुमकडे शेतकऱ्यांचा कल

अकोला ः वाशीम जिल्ह्यातील शेलू खडसे गावात शेतकऱ्यांनी घरात छोट्याशा जागेत असे बेड तयार करून मशरुम उत्पादन सुरू केले.
अकोला ः वाशीम जिल्ह्यातील शेलू खडसे गावात शेतकऱ्यांनी घरात छोट्याशा जागेत असे बेड तयार करून मशरुम उत्पादन सुरू केले.

अकोला : शेती करतानाच सोबतीला कमी जागेत व थोड्या मेहनतीने मशरूम उत्पादन घेतले तर चांगला पैसा मिळू शकताे हे वाशीम जिल्ह्यात सध्या घडू लागले अाहे. कृषी समृद्धी समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाअंतर्गत या जिल्ह्यात चार क्लस्टरमध्ये सुमारे ३०० जणांनी मशरूम उत्पादनाला सुरवात केली असून, यापैकी अनेकांची पहिली बॅच निघाली. यातून सहा ते साडेसहा हजारांचे उत्पन्न हातात पडले अाहेत.

उत्पादीत होणारे मशरूम विक्रीसाठी अमरावती जिल्ह्यातील उत्पादकासोबत करार करून देण्यात अाला. वाशीम जिल्ह्यात केमचे मंगरुळपीर, मालेगाव, रिसोड, कारंजा हे क्लस्टर अाहेत. यामध्ये सुमारे ३०० जणांना स्वयंरोजगाराचे साधन म्हणून मशरुम उत्पादनाचे प्रशिक्षण दिल्या गेले. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून या जिल्ह्यात मशरुम उत्पादनासाठी शेतकरी सरसावले. ४० दिवसांत मशरुमची बॅच निघते.

दहा बाय दहा एवढ्या जागेतही काहींनी मशरुम उत्पादनासाठी बेड टाकले. एका शेतकऱ्याकडे कमीत कमी १५० बेड अाहेत. केमप्रकल्पातून या शेतकऱ्यांना प्रतिव्यक्ती २५५० रुपयांचे सहकार्य करण्यात अाले. यात प्रामुख्याने स्पॉर्न, बेड तयार करण्यासाठी तार, दोरी, केमिकल देण्यात अाले. सरासरी ४० दिवसांत एक बॅच निघते. वाळवलेल्या मशरुमला ८०० रुपये किलो दराने खरेदीचा करार प्रशासनाच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यातील भारत मशरुम या उत्पादकासोबत करून देण्यात अाला. 

मशरुम उत्पादनाची साखळी कमी जागेत शेतकरी बेड तयार करतात. त्यात स्पॉर्न टाकून त्यावर दिवसातून तीन वेळा पाण्याचा छिडकावा केला जातो. अंधारलेल्या खोलीत हे कार्य चालते. सुमारे ३५ ते ४० दिवसांपर्यंत ही बॅच राहते. तयार झालेले मशरुम काढून ते सूर्यप्रकाशात वाळवले जाते. त्यानंतर सीलबंद करून संबंधित खरेदीदाराला दिले जात अाहे

कृषी समृद्धी समन्वयीत विकास प्रकल्पाच्या माध्यमातून एका लाभार्थ्यास २५५० रुपयांचे सहकार्य करण्यात अाले. यात स्पॉन (मशरुम बियाणे), प्लॅस्टिकबॅग, तार, दोरी, केमिकल वाटप करण्यात अाले. यानंतर अाता मशरुम उत्पादन सुरू झाले असून काही लाभार्थ्यांना धनादेश वितरीत झाले अाहेत.   - व्ही. अार. डोणे, कृषी व्यवसाय तज्ज्ञ, कृषी समृद्धी वाशीम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com