agriculture news in Marathi, agrowon, The farmers will get a full meal only five rupees | Agrowon

शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर जेवण
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 मे 2018

लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला शेतमाल विकण्यासाठी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. सकाळी लवकर हे शेतकरी घरातून बाहेर पडतात. त्यांना येथे आल्यानंतर जेवणासाठी हॉटेलमध्ये जावे लागते. त्यांची ही अडचण ओळखून बाजार समितीने सध्याच्या महागाईच्या काळात शेतकऱ्यांसाठी केवळ पाच रुपयांत पोटभर जेवण देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी (ता. २५) या उपक्रमाला सुरवात करण्यात येणार आहे.

लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला शेतमाल विकण्यासाठी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. सकाळी लवकर हे शेतकरी घरातून बाहेर पडतात. त्यांना येथे आल्यानंतर जेवणासाठी हॉटेलमध्ये जावे लागते. त्यांची ही अडचण ओळखून बाजार समितीने सध्याच्या महागाईच्या काळात शेतकऱ्यांसाठी केवळ पाच रुपयांत पोटभर जेवण देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी (ता. २५) या उपक्रमाला सुरवात करण्यात येणार आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती संपूर्ण मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. लातूरसह परिसरातील जिल्हे, तसेच कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या शेजारील राज्यातील शेतकरीही आपला शेतमाल विक्रीसाठी येथे घेऊन येतात. या शेतकऱ्यांना लातूर बाजारपेठेत चांगला भाव, तसेच रोखीने पैसे मिळतात. यामुळे लातूर बाजार समितीमध्ये दररोज हजारो शेतकरी शेतमाल घेऊन येतात. अनेक शेतकरी सकाळी किंवा पहाटे जेवण न  करता घराबाहेर पडतात. अशा शेतकऱ्यांना शेतमाल विक्री होईपर्यंत उपाशी राहावे लागते. हॉटेलमधील जेवण परवडत नाही. त्यामुळे बहुसंख्य शेतकरी उपाशीपोटी राहतात. हे लक्षात घेऊन लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी अत्यल्प दरात भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. 
शेतकऱ्यांना केवळ पाच रुपयांमध्ये पोटभर जेवण दिले जाणार आहे. शुक्रवारी (ता. २५) सकाळी ११ वाजता दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ केला जाणार आहे. 

बाजार समितीत शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण ओळखून ही योजना सुरू करण्यात आली आहे. यात पाच रुपयांत वरण, भात, भाजी, चपाती, कांदा, लिंबू, ठेचा असे पोटभर जेवण दिले जाणार आहे. याकरिता शेतकरी भोजनालय उभारण्यात आले आहे. त्यात स्टेनस्टीलचा वापर करून फर्निचर तयार करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना व्यवस्थित बसून भोजन करता येणार आहे.
- मधुकर गुंजकर, सचिव, बाजार समिती.

 

 

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात १८९ मंडळात जोरदार पाउस औरंगाबाद : मराठवाड्यातील 421 महसुल मंडळांपैकी तब्...
हिंगोली जिल्ह्यात सोळा मंडळात अतिवृष्टीहिंगोली : जिल्ह्यात मागील चोवीस तासांमध्ये दोन...
परभणीतील २४ मंडळात अतिवृष्टी नदी, नाले...परभणी : जिल्ह्यात बुधवार पासून पावसाचे...
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनादेड : जिल्ह्यातील माहूर, किनवट, भोकर, हिमायतनगर...
कोयनेत पूरस्थिती शक्‍यपाटण, जि. सातारा : कोयना धरण पाणलोट...
कर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का ?सातारा - ‘‘सोसायटीचे एक लाख ३० हजार रुपयांचे...
यवतमाळ जिल्ह्यात पूर परिस्थिती यवतमाळ  : जिल्हयात सुरु असलेल्या संततधार...
राज्यात भेंडी ५०० ते ३००० रुपये...सांगलीत दहा किलोस २५० ते ३०० रुपये  सांगली...
राज्याचा पुरोगामित्वाचा वारसा जपूया :...मुंबई: शेती, पाणी, गुंतवणूक, गृहनिर्माण अशा विविध...
विदर्भात पावसाचे जोरदार कमबॅकनागपूर ः गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या...
शिराळ्यात नागप्रतिमेची पूजाशिराळा, जि. सांगली ः  अनेक वर्षे जिवंत...
अकोल्यात पावसाचे आगमनअकोला : या भागात गेल्या २० पेक्षा अधिक...
एकात्मिक कीड नियंत्रणात फेरोमोन...कामगंध सापळ्यांचा वापर केल्यास कमी खर्चात कीड...
उत्पादनवाढीसाठी एअरोसोल्सद्वारे...पृथ्वीच्या वातावरणामध्ये कृत्रिमरीत्या सल्फेट...
राजकीय सभ्यता व सुसंस्कृतपणा जपणारा एक...पुणे : राजकिय विरोध कितीही असला तरी राजकारणातील...
अटलजी : एका उत्तुंग नेतृत्वाचा अस्तभारताचे माजी पंतप्रधान, देशाचे लोकप्रिय नेते...
देशाने महान पुत्र गमावला : राहुल गांधी नवी दिल्ली : ''आज भारताने महान पुत्र गमावला...
वाजपेयींच्या निधनाने एका युगाचा अंत :...नवी दिल्ली : ''अटलजींच्या निधनाने एका युगाचा...
अजातशत्रू, मुरब्बी राजकारणी : अटल...शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे,...
...या आजारांनी वाजपेयींना ग्रासले होतेनवी दिल्लीः माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...