agriculture news in Marathi, agrowon, farming work hit by Diesel price hike | Agrowon

डिझेल दरवाढीचा शेतीच्या मशागतीलाही फटका
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 29 मे 2018

अकोला  ः देशात पेट्रोल, डिझेल दरांमध्ये सतत वाढ होत असून, याचा थेट परिणाम कृषी क्षेत्रावरही पडू लागला आहे. हंगामाच्या तोंडावर डिझेलच्या दरवाढीमुळे ट्रॅक्‍टरच्या साह्याने होणाऱ्या सर्व प्रकारच्या मशागतींचे दर सव्वा ते दीडपटीने वाढले आहेत. याचा थेट फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर वाढत असल्याने सर्वसामान्य जनतेत रोष वाढत चालला आहे. विरोधकांनी सरकारच्या विरोधात सर्वत्र आंदोलने सुरू केली आहेत.

अकोला  ः देशात पेट्रोल, डिझेल दरांमध्ये सतत वाढ होत असून, याचा थेट परिणाम कृषी क्षेत्रावरही पडू लागला आहे. हंगामाच्या तोंडावर डिझेलच्या दरवाढीमुळे ट्रॅक्‍टरच्या साह्याने होणाऱ्या सर्व प्रकारच्या मशागतींचे दर सव्वा ते दीडपटीने वाढले आहेत. याचा थेट फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर वाढत असल्याने सर्वसामान्य जनतेत रोष वाढत चालला आहे. विरोधकांनी सरकारच्या विरोधात सर्वत्र आंदोलने सुरू केली आहेत.

ठिकठिकाणी मोर्चे धडकत आहेत. डिझेलच्या दरात वाढ झाल्याने ट्रॅक्‍टर चालकांनी मशागतीचे दर वाढविले आहेत. साधारणतः ६५ रुपयांपर्यंत मिळणारे डिझेल सध्या ७२ ते ७३ रुपये लिटर दराने खरेदी करावे लागत आहे. लिटरमागे सात ते आठ रुपयांची मोठी वाढ झाली आहे. यामुळे साहजिकच ट्रॅक्‍टरचे दर वाढवावे लागले, असे चालकांचे म्हणणे आहे.
सध्या शेतीची ६० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मशागत ही भाड्याने ट्रॅक्‍टर सांगून केली जाते.

गेल्या हंगामात नांगरटीचा दर चारशे ते पाचशे रुपये एकर होता. या वर्षी तो सातशे रुपयांवर पोचला आहे. रोटाव्हेटर जे सातशे रुपये एकर व्हायचे ते थेट नऊशे ते एक हजार रुपये करण्यात आले. ट्रॅक्‍टरच्या साह्याने एक पिशवी सोयाबीन पेरण्यासाठी ५०० रुपये घेतले जात होते. 

या वर्षी डिझेलचे दर वाढल्याने हा दर सातशे ते आठशे रुपये आकारल्या जाऊ शकतो, असे ट्रॅक्‍टर मालकांनी सांगितले. जर ही दरवाढ अशीच होत राहली तर ट्रॅक्‍टरने केल्या जाणाऱ्या मशागतीच्या दरांमध्ये आणखी वाढीची शक्‍यता वर्तविली जात आहे.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...
अकोला जिल्ह्यात १७०० शेततळी पूर्णअकोला   ः शासनाच्या मागेल त्याला शेततळे...