जळगाव जिल्ह्यात ३५ ते ४० हजार टन खते पडून
चंद्रकांत जाधव
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017
जळगाव : जिल्ह्यात यंदाच्या खरिपात खतांचा मुबलक प्रमाणात पुरवठा झाला. पण गरजेच्या वेळी पाऊस न आल्याने खतांची उचल झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यात विविध गोदामे, दुकाने आदी ठिकाणी मिळून जवळपास ३५ ते ४० हजार मेट्रिक टन खते पडून आहेत, असा अंदाज जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने व्यक्त केला आहे. 
 
जळगाव : जिल्ह्यात यंदाच्या खरिपात खतांचा मुबलक प्रमाणात पुरवठा झाला. पण गरजेच्या वेळी पाऊस न आल्याने खतांची उचल झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यात विविध गोदामे, दुकाने आदी ठिकाणी मिळून जवळपास ३५ ते ४० हजार मेट्रिक टन खते पडून आहेत, असा अंदाज जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने व्यक्त केला आहे. 
 
जळगाव जिल्हा खतांच्या वापरामध्ये आघाडीवर आहे. खरिपात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गरज जिल्ह्यात असते, त्यामुळे मागणीदेखील अधिक करावी लागते. त्या दृष्टिने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने मागणी कृषी आयुक्तालयाकडे नोंदविली. जशी मागणी नोंदविली, तसा लक्ष्यांकही मंजूर झाला, परंतु जून ते ऑगस्ट या खरिपातील पिकांच्या वाढीच्या काळात पावसाने ओढ दिल्याने खतांची हवी तशी उचल झाली नाही.
 
जिल्ह्यात दर महिन्याला खतांचा सुरळीत व हवा तेवढा किंवा लक्ष्यांकानुसार पुरवठा खत कंपन्यांनी केला. पण मागणीअभावी खते पडून आहेत. जिल्ह्यात युरिया, संयुक्त खते, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश अशी सर्वच खते कमी अधिक प्रमाणात पडून आहेत. डीएपी अधिक प्रमाणात पडून असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे मिळाली. 
 
जिल्ह्यात युरियाची गरज दरवर्षी अधिक असते. त्यामुळे युरियाची दीड लाख मेट्रिक टन एवढी मागणी नोंदविण्यात आली. त्यानुसार आतापर्यंत एक लाख आठ हजार मेट्रिक टन एवढ्या युरियाचा पुरवठा झाला आहे. त्याची उचल जुलैच्या सुरवीताला व ऑगस्टमध्ये झाली. परंतु, सद्यःस्थितीत केवळ केळी पट्टयात युरियाची मागणी असल्याचे सांगण्यात आले. जी शिल्लक खते आहे, ती परत जाणार नाहीत. त्यांचा वापर रब्बी हंगामासाठी केला जाईल. त्यासंदर्भातील नोंदी कृषी विभागातर्फे घेतल्या जात आहेत. नेमकी कुठली खते किती पडून आहेत किंवा त्यांची विक्री झालेली नाही, याची माहिती संकलित करण्याची कार्यवाही कृषी विभाग करीत आहे. 

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात ३५ ते ४० हजार टन खते... जळगाव : जिल्ह्यात यंदाच्या खरिपात खतांचा मुबलक...
सोलापूर बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने...
उद्याेग जननी कमल पुरस्कारांचे वितरणपुणे : महिला बचत गटांनी आणि महिला शेतकऱ्यांनी...
देशातील खरीप पीक १०४९ लाख हेक्टरवर नवी दिल्ली ः देशातील खरीप पीक क्षेत्र गेल्या...
देशातील ९१ धरणांत ५९ टक्के पाणीसाठा नवी दिल्ली ः देशातील धरणांत ५९ टक्के पाणीसाठा ...
नगर, नाशिक जिल्ह्यांतून टोमॅटोची आवक... नाशिक : गत सप्ताहात राज्यातील टोमॅटो उत्पादक...
साताऱ्यात वांगी, टोमॅटोची आवक वाढली सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नागपुरात सरबती गहू २२०० ते २६०० रुपये... नागपूर ः येथील कळमना बाजार समितीत गत...
पितृपंधरवड्यामुळे सोलापुरात गवार, भेंडी... सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
धुळे, जळगाव जिल्ह्यातील हंगामी... जळगाव : धुळे व जळगाव जिल्ह्यांत हंगामी पैसेवारी...
कोल्हापूर बाजार समितीत फूल बाजार सुरू कोल्हापूर : येथील बाजार समितीत सोमवार (ता. १८)...
सातारा जिल्ह्यात ६५७ शेततळ्यांची कामे... सातारा : मागेल त्याला शेततळे योजनेस सातारा...
राज्यात आज पावसाचा अंदाजपुणे ः काेकण आणि गाेव्यात मंगळवारी (ता. १९) तुरळक...
डाळिंबावर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव सांगली : जिल्ह्यात मृग हंगामातील डाळिंबाचा बहर...
दर्जेदार डाळिंबासाठी जमिनीच्या...सोलापूर : डाळिंबाच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमीन...
उत्पादन खर्चात मोठी घट, पोल्ट्रीचा ‘...गेल्या महिनाभरात पोल्ट्री खाद्यासाठी लागणाऱ्या...
पुणे बाजार समितीत घाणीचे साम्राज्यपुणे : अाशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची बाजार...
शाहु महाराज, अंबाबाईचे दर्शन घेवुन... कऱ्हाड - घटस्थापनेदिवशी 21...
शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने शेती करावी :...परभणी : सरकार तसेच कृषी विद्यापीठे शेतकऱ्यांच्या...
‘गोकुळ’च्या अध्यक्ष बदलाच्या हालचालीकोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघाची (गोकूळ)...