agriculture news in Marathi, agrowon, figures of GDP ARE suspicious | Agrowon

विकासदराची जाहीर आकडेवारी संशयास्पद
टीम अॅग्रोवन
रविवार, 1 एप्रिल 2018

नाशिक : विकासदर झपाट्याने वाढत असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र तशी नाही. विकासदराचे जाहीर केलेले जात असलेले आकडेच संशयास्पद ठरत असून, त्यावर विश्‍वास ठेवून चालणार नाही. नोटाबंदी करण्याच्या निर्णयापेक्षा दुसरा कोणताही निर्णय चुकीचा असूच शकत नाही, असे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सांगितले.

नाशिक : विकासदर झपाट्याने वाढत असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र तशी नाही. विकासदराचे जाहीर केलेले जात असलेले आकडेच संशयास्पद ठरत असून, त्यावर विश्‍वास ठेवून चालणार नाही. नोटाबंदी करण्याच्या निर्णयापेक्षा दुसरा कोणताही निर्णय चुकीचा असूच शकत नाही, असे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सांगितले.

भगवान महावीर जन्मकल्याण सोहळ्यानिमित्त नाशिक येथील प.सा. नाट्यगृहात शुक्रवारी (ता. ३०) आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. देशहिताच्या गोष्टी लोकांसमोर ठेवण्याच्या सिद्धांतावर चालण्याचे आपण ठरविले असून, कोणाच्या नाराजीच्या वा समाधानाची चिंता करीत नसल्याचे सांगत सिन्हा म्हणाले, की लोकशाही ज्या ज्या वेळी संकटात सापडली, त्या त्या वेळी जनता एकजुटीने लोकशाहीच्या बाजूने उभी राहिली आहे. 

सिन्हा पुढे म्हणाले, की १९९०-९१ मध्ये आपण सहा महिन्यांसाठी अर्थमंत्री होतो, त्या वेळी अर्थव्यवस्था संकटात होती. त्यानंतर चंद्रशेखर यांचे सरकार पडणे, हे आणखी एक संकट देशासमोर होते. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात आर्थिक सुधारणांना वेग आला. १९९८-१९९९ मध्ये आपण पुन्हा अर्थमंत्री झालो तेव्हा आधीच्या तीन वर्षांत विकासदर चार टक्क्यांपर्यंत होता. म्हणजे तेव्हाही आर्थिक संकट कायम होते. पुढे मात्र अटलबिहारी सरकारच्या काळात अर्थव्यवस्थेला गती मिळाली आणि विकासदर आठ टक्क्यांपर्यंत पोचला होता

देशात शेतकरी सर्वांत दुखी आहे. महाराष्ट्रात कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतीमालाला भाव न मिळणे हे प्रमुख कारण त्यामागे आहे. विदर्भाची ओळख शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची म्हणून होत आहे. बेरोजगारी वाढत आहे. त्याचे कारण म्हणजे नोटाबंदीचा निर्णय आणि जीएसटी असल्याची टीका सिन्हा यांनी केली.

इतर बातम्या
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
व्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
चारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
आंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...
मापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर  : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...
तीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...