जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (ज्वारी) आवक सुरू झाली असून, मागील आठवड्यात
बातम्या
सोलापूर ः मोहोळ तालुक्यातील सावळेश्वरमधील रोजगार हमी योजनेच्या कामातील गैरव्यवहाराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तालुक्यातील अन्य कामांबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. सावळेश्वरच्या प्रकरणात दस्तुरखुद्द गावच्या सरपंचांनी केलेल्या तक्रारीमुळे या प्रकरणाला महत्त्व आले आहे. "सकाळ- ॲग्रोवन''नेही गेल्या दोन दिवसांपासून हे प्रकरण नेमके काय आणि कसे घडले, याबाबत सविस्तर वृत्तमालिका प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेतली आहे. आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या मंगळवारपासूनच (ता.
सोलापूर ः मोहोळ तालुक्यातील सावळेश्वरमधील रोजगार हमी योजनेच्या कामातील गैरव्यवहाराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तालुक्यातील अन्य कामांबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. सावळेश्वरच्या प्रकरणात दस्तुरखुद्द गावच्या सरपंचांनी केलेल्या तक्रारीमुळे या प्रकरणाला महत्त्व आले आहे. "सकाळ- ॲग्रोवन''नेही गेल्या दोन दिवसांपासून हे प्रकरण नेमके काय आणि कसे घडले, याबाबत सविस्तर वृत्तमालिका प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेतली आहे. आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या मंगळवारपासूनच (ता. १३) ही समिती थेट चौकशीला सुरवात करणार आहे.
रोजगार हमी योजनेतून सावळेश्वरमध्ये करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाची बिले पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या डिजिटल सहीचा गैरवापर करून करण्यात आली, त्याची बिलेही परस्पर मजुरांच्या नावे जमा करण्यात आली, काही ठिकाणी कामे मंजूर नसताना ती मंजूर दाखवून बिले उचलली, अशा तक्रारी करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे सरपंच, सदस्यांना याची काहीच कल्पना नाही, या कामासाठी नेमणुकीस असलेल्या रोजगार सेवकालाही यामध्ये अंधारात ठेवण्यात आले. त्यामुळे या प्रकरणातील गांभीर्य वाढले आहे. "सकाळ-ॲग्रोवन''ने सविस्तरपणे यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनानेही त्याची दखल घेतली आहे.
आता जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी या कामाच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे. मंगळवारपासून तातडीने चौकशीचे हे काम सुरू होईल, सावळेश्वरमधील ज्या कामांबाबत आक्षेप घेण्यात आले आहेत, ती सर्व कामे पाहण्यासह, कोणती कामे मंजुरीविना करण्यात आली आहेत, ती ठिकाणे पाहणे, काम केलेल्या मजुरांचे जबाब नोंदवणे, आदी कामे दोन अधिकाऱ्यांची ही समिती करेल.
या रस्त्याच्या कामावर दाखविण्यात आलेले मजूर त्याच दिवशी दुसऱ्या ठिकाणी कामाला असल्याचे पुरावे आहेत. त्यापैकी काहींनी आपण या कामावरच हजर नसल्याचे या आधीच लेखी दिले आहे. त्याशिवाय हे काम पाहणाऱ्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनीही या कामाची कागदपत्रे आपल्याकडे नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी दिले आहे. त्यामुळे या कामातील नेमके गौडबंगाल काय? हे शोधण्याचे काम आता चौकशी समिती करणार आहे.
- 1 of 566
- ››