'मंत्रालयात उंदीर मारणाऱ्या संस्थेचे अस्तित्व तपासा'

'मंत्रालयात उंदीर मारणाऱ्या  संस्थेचे अस्तित्व तपासा'
'मंत्रालयात उंदीर मारणाऱ्या संस्थेचे अस्तित्व तपासा'

मुंबई : उंदीर मारण्याच्या विषयावरून राज्य सरकार चांगलेच अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकारच्या बांधकाम विभागाने आता ज्या संस्थेला उंदीर मारण्याचे काम दिलेले आहे, त्या संस्थेचे अस्तित्व काय, याची माहिती घेण्यासाठी सहकार खात्याला पत्र दिल्याची माहिती बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (ता.२६) विधानसभेत दिली. 

एकनाथ खडसे यांच्या उंदीर बाँबने राज्य सरकारची कोंडी झाली आहे. उंदीर प्रकरणात झालेली कोंडी सोडविण्यासाठी आता सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. उंदीर प्रकरणात राज्य सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदन केले. या वेळी हे काम उंदीर मारण्याचे काम नसून उंदीर निर्मूलनासाठीच्या उयाययोजनेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

उंदीर निर्मूलनाचे काम ज्या मजूर संस्थेला दिले होते. त्या संस्थेला दिलेले पैसे हे मुंबई जिल्हा बॅंकेतील त्यांच्या चालू खात्यात जमा केले असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणले. तसेच बांधकाम विभागाने ज्या संस्थेला उंदीर मारण्याचे काम दिलेले आहे, त्या संस्थेचे अस्तित्व काय आहे, याची माहिती घेण्यासाठी सहकार खात्याला पत्र दिले असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. दुसरीकडे ज्या कंपनीला उंदीर मारण्याचे कंत्राट दिले होते, ती कंपनीच दिलेल्या पत्त्यावर अस्तित्वात नसल्याचे समोर आले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com