नगरमध्ये ४२६ चारा छावण्यांवर गुन्हे

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः जिल्ह्यात २०१२ ते २०१४ या कालावधीत पडलेल्या दुष्काळात ४२६ चारा छावण्यांत अनियमितता आढळून आली होती. त्यामुळे या चारा छावण्या चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार जिल्हाभरातील ४२६ चारा छावण्या चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.   

जिल्ह्यामध्ये २०१२ ते २०१४ या काळातील दुष्काळी परिस्थितीच्या काळात जनावरे वाचवण्यासाठी शासनाच्या वतीने संस्थामार्फत जवळपास साडेचारशेच्या दरम्यान चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ४२६ चारा छावण्यांमध्ये अनियमितता आढळली होती.

जनावरांची संख्या, चारा उपलब्धता व अन्य विविध मुद्यांच्या अनुषंगाने अनियमितता आढळलेल्या चारा छावण्यांना दंडसुद्धा करण्यात आला होता. आता सरकारकडून पुन्हा ज्या चारा छावण्यांच्या कामकाजात अनियमितता आढळली होती, मात्र संबंधितावर प्रशासन कारवाई करत नसल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मात्र प्रशासनाने कारवाई करण्याला सुरवात केली.

पहिल्या टप्प्यात आडीचशे चारा छावण्या चालकावर गुन्हे दाखल केले होते. आता सर्वच्या सर्व ४२६ दोषी चारा छावण्या चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदे, जामखेड, नेवासे या आठ तालुक्‍यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. दुष्काळी परिस्थितीत पशुधन वाचविण्यासाठी जिल्ह्यात २०१२ ते २०१४ मधील चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. या चारा छावणीत गैरव्यवहार झाल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील गोरख आनंदा घाडगे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या संयुक्त न्यायपीठासमोर तीन मार्चपर्यंत १४ वेळेस सुनावणी झाली आहे.  

तालुकानिहाय दाखल झालेले गुन्हे नगर - ७१, पारनेर - ४१, पाथर्डी - ३२, शेवगाव - ३३,  कर्जत - १३२, श्रीगोंदे - ८१, जामखेड - २७, नेवासे - ०९.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com