वाढत्या तापमानात जनावरांच्या आहार व्यवस्थापनामध्ये आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे.
अॅग्रो विशेष
अकोला : छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेअंतर्गत जाहीर झालेल्या कर्जमाफी योजनेसाठी शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजेच शुक्रवार (ता.२२) पर्यंत वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांमध्ये पाच लाख १६ हजार ५८२ शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली.
शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी शासनाने ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले होते. यासाठी महा ई-सेवा केंद्र, सुविधा केंद्रांच्या माध्यमातून २४ जुलै ते २२ सप्टेंबर या काळात कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले.

नेट कनेक्टिव्हिटी, सर्व्हर डाऊन राहणे, तासनतास लिंक न मिळणे, अंगठ्याचे ठसे न जुळणे, आधारलिंक, मोबाईल लिंक आणि शेवटच्या टप्प्यात सर्व बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाची माहिती सादर करण्याची सूचना अशा विविध अडचणींना सामोरे जावे लागले.
अनेक ठिकाणी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत रांगा लागल्या होत्या. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया मोफत उपलब्ध करून देण्यात आलेली असली तरी अनेक ठिकाणी केंद्र संचालकांनी शेतकऱ्यांकडून ५० ते १०० रुपयांपर्यंत मोबदला घेतला.
अर्ज भरल्या जात असल्याने शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या नाहीत हा भाग वेगळा. शुक्रवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. या काळात वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांचा आढावा घेतला असता बुलडाणा जिल्ह्यात दोन लाख ४९ हजार ९२१ अर्ज सायंकाळपर्यंत ऑनलाइन दाखल झाले होते.
अकोल्यामध्ये एक लाख ३८ हजार ५४३ तर वाशीम जिल्ह्यात एक लाख २८ हजार ११८ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले आहेत. ऑनलाइन दाखल झालेल्या अर्जांचे आता येत्या २७ व २८ सप्टेंबरला चावडी वाचन केले जाणार आहे. या चावडी वाचनात शेतकऱ्यांच्या याद्या वाचनाचे काम केले जाईल. या कामासाठी महसूल यंत्रणांनी कुठलीही कुचराई करू नये, असे निर्देश प्रशासनाने काढले आहेत.
- 1 of 287
- ››