agriculture news in Marathi, agrowon, Five lakh applications from Warhad for waiverGrant of funding for the year has not been received by the farmers | Agrowon

वर्ष लोटूनही मिळाले नाही शेततळे अस्तरीकरणाचे अनुदान
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 मार्च 2018

जालना  : एकदा त्रुटी काढलेल्या प्रस्तावाची त्रुटी दूर केली. परंतु त्यांनतर जवळपास वर्ष लोटूनही शेततळ्यात केलेल्या अस्तरीकरणाचे अनुदानच मिळाले नसल्याची तक्रार अंबड तालुक्‍यातील टाका येथी महिला शेतकरी चंद्रकला सखाराम जायकर यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे. या प्रकरणी न्याय न मिळल्यास १ एप्रिलपासून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

जालना  : एकदा त्रुटी काढलेल्या प्रस्तावाची त्रुटी दूर केली. परंतु त्यांनतर जवळपास वर्ष लोटूनही शेततळ्यात केलेल्या अस्तरीकरणाचे अनुदानच मिळाले नसल्याची तक्रार अंबड तालुक्‍यातील टाका येथी महिला शेतकरी चंद्रकला सखाराम जायकर यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे. या प्रकरणी न्याय न मिळल्यास १ एप्रिलपासून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या जायकर कुटूंबीयांकडे जवळपास साडेपाच एकर शेती आहे. या शेतीत त्यांच्याकडे दोन वर्षांपासून डाळिंब व जवळपास दहा वर्षापासून मोसंबीची फळबाग आहे. फळबागेसाठी त्यांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शेततळे घेतले. या शेततळ्यात अस्तरीकरणासाठी त्यांनी कृषी विभागाकडे अर्ज सादर केला. त्यानुसार त्यांना १३ जानेवारी २०१७ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला.

जायकर यांनी अस्तरीकरण केले मात्र त्यांचा अर्ज त्रुटीत काढण्यात आला. जनधन खात्याची असलेली त्रुटी दूर करून त्यांनी जून २०१७ मध्ये प्रस्ताव कृषी विभागाकडे सादर केला. परंतु अजूनपर्यंत त्यांना अस्तरीकरणाचे अनुदान मिळाले नाही. आम्ही प्रस्ताव दिल्यापासून कृषी विभागाच्या कार्यालयाकडे बारा वेळा चकरा मारल्या; परंतु प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे, यापलीकडे कोणतेही उत्तर कृषी विभागाकडून देण्यात आले नसल्याची माहिती श्रीमती जायकर यांचा मुलगा सिद्धू जायकर यांनी दिली.

वारंवार विनंती करूनही दखल घेतल्या जात नसल्याने १९ मार्चला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. त्यानुसार येत्या ३१ मार्चपर्यंत अस्तरीकरणाचे अनुदान न मिळाल्यास १ एप्रिलपासून अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा श्रीमती चंद्रकला जायकर यांनी दिला आहे. 
 

बैलजोडी विकून आम्ही शेततळ्याचे अस्तरीकरण केले. काढलेली त्रुटी दूर करून प्रस्ताव सादर केला. मात्र वर्ष लोटूनही त्यावर निर्णय न झाल्याने आता अनुदान न मिळाल्यास न्यायासाठी उपोषणाशिवाय पर्याय नाही.  
- सिद्धू सखाराम जायकर, अर्जदार महिला शेतकऱ्याचा मुलगा, टाका ता. अंबड, जि. जालना. 

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...