agriculture news in Marathi, agrowon, Five lakh applications from Warhad for waiverLoan reduction from land acquisition in Washim | Agrowon

वाशीममध्ये भूसंपादन मोबदल्यातून कर्जाची कपात
सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

वाशीम  ः जिल्ह्यातील ५४ गावांमधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादन मोबदल्यापोटी मिळालेल्या रकमेतून पीककर्जाची रक्कम व्याजासहित परस्पर कापून घेतली जात आहे. यामुळे कृषी समृद्धी महामार्गबाधित शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. 

जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाचे काम सुरू आहे. यातील ७२ टक्के भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महामार्गासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांनी ‘लॅंड पुलिंग’अंतर्गत शासनाला जमिनी खरेदी करून दिल्या आहेत.

वाशीम  ः जिल्ह्यातील ५४ गावांमधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादन मोबदल्यापोटी मिळालेल्या रकमेतून पीककर्जाची रक्कम व्याजासहित परस्पर कापून घेतली जात आहे. यामुळे कृषी समृद्धी महामार्गबाधित शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. 

जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाचे काम सुरू आहे. यातील ७२ टक्के भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महामार्गासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांनी ‘लॅंड पुलिंग’अंतर्गत शासनाला जमिनी खरेदी करून दिल्या आहेत.

शासनाने या जमिनींच्या संदर्भात दिशानिर्देश जारी केले होते. त्यानुसार भूसंपादन मोबदल्यामधून कोणतेही कर्ज कपात केले जाणार नसल्याची घोषणा केली होती. मात्र, सध्या जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन पूर्ण झाले आहे त्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात रक्कम वळती करताना भूसंपादन रकमेतून पीककर्जाच्या रकमेसह व्याजाची रक्कमही कपात केली जात आहे. त्यामुळे या ५४ गावांतील शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. 

शेतकऱ्यांना व्याज परत मिळेल ः माळी
शेतकऱ्यांच्या भूसंपादन मोबदल्याची रक्कम बॅंकांच्या खात्यांत जमा करताना ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर बोजा आहे त्यांची रक्कम कपात केली जात आहे. व्याज शेतकऱ्यांना परत केले जाणार असल्याची माहिती, भूसंपादन अधिकारी सुनील माळी यांनी दिली. 

कर्जमाफीची घोषणा कशासाठी?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील महिन्यात शेतकरी मोर्चाला जून २०१७ पर्यंतचे पीककर्ज माफ केले जाईल, अशी घोषणा केली होती. या संदर्भात बॅंकांना मात्र कोणतेही आदेश अजूनपर्यंत दिले नसताना, जून २०१७ पूर्वीचेही पीककर्ज व्याजासहित संपादन मोबदल्यातून कापले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची घोषणा कशासाठी, असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

इतर बातम्या
साखरेच्या गोळ्याही करतील वेदना कमीवाढत्या स्थौल्यत्वासारख्या व त्या अनुषंगाने...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
कडधान्याची कमी दरात सर्रास खरेदीजळगाव ः जिल्ह्यातील जळगाव, चोपडा, पाचोरा,...
राज्यातील विकास सोसायट्यांना रिक्त...सांगली ः राज्यातील विकास सोसायट्यांची संख्या २१...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
पुण्यात एक ऑक्टोबरला ‘कृषी कल्चर’ ज्ञान...पुणे ः शेतीमधील बदलत्या तंत्रावर प्रकाश टाकणारा...
पावसाच्या तुरळक हजेरीने हलका दिलासापुणे: पावसाच्या दीर्घ खंडानंतर राज्यात दोन...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या...
पोटॅशचा मोठा तुटवडाजळगाव  ः रेल्वेकडून खत पुरवठादार किंवा खत...
कीडनाशकांबाबतच्या याचिकेची सर्वोच्च...नवी दिल्ली ः मानवी आरोग्याला धोकादायक व भारतात...
राज्यात उद्यापासून पावसाचे संकेतपुणे: बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी...
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
जळगाव जिल्ह्यात तुरळक पाऊसजळगाव ः जिल्ह्यात सोमवारी (ता. १७) सकाळी ८ पर्यंत...
महाराष्ट्रात भावांतर योजना लागू...परभणी ः शेती एवढ्या समस्या कुठेच नाहीच. सर्व...