agriculture news in Marathi, agrowon, foot and mouth vaccine supplies Inquiry | Agrowon

लाळ्या खुरकूत लस पुरवठा विलंबाच्‍या चाैकशीचे आदेश
टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 मार्च 2018

पुणे  ः लाळ्या खुरकूत लसींच्या पुरवठ्याच्या विलंबाबाबतच्‍या चाैकशीचे आदेश सरकारने दिले आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) मुकेश खुल्लर यांची एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली अाहे. 

पुणे  ः लाळ्या खुरकूत लसींच्या पुरवठ्याच्या विलंबाबाबतच्‍या चाैकशीचे आदेश सरकारने दिले आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) मुकेश खुल्लर यांची एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली अाहे. 

लाळ्या खुरकूत लसींच्या पुरवठा निविदा प्रक्रियेत दाेन कंपन्यांच्या दरांच्या वादामुळे पुरवठा रखडला आहे. परिणामी दाेन लसीकरण न झाल्यामुळे राज्यातील दीड काेटी पशुधनाचे आराेग्य धाेक्यात आले आहे. दरम्यान लस खरेदी करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदेतील अट क्रमांक १०(b) नेमकी तरतूद काय हाेती. त्या अनुषंगाने यशस्वी निविदाकारासाेबत करण्यात आलेल्या करारनाम्यातील अट क्रमांक ८ मध्ये अंतर्भूत करण्यात आलेली तरतूद काय, याची तपासणी करून करारनाम्यात फेरफार करण्यात आला की नाही किंवा केले असल्यास नेमके काेणते फेरफार करण्यात आले, याची चाैकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

तसेच यामध्ये शासनाचे आर्थिक नुकसान झाले असल्यास त्याची व्याप्ती निश्‍चित करण्याच्यादेखील सूचना करण्यात आल्या आहेत. तर संबंधित अधिकारी, पुरवठादार कंपनीचा सहभाग, कंपनीचे आर्थिक हित जाेपासण्यासाठी कंपनीने केलेले प्रयत्न व त्यानुसार निदर्शनास आलेली कंपनीची भूमिका याबाबतदेखील चाैकशी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. 

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...