agriculture news in Marathi, agrowon, forest land count by GPS | Agrowon

वनहक्क जमिनींची ‘जीपीएस’द्वारे मोजणी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

नाशिक  : आदिवासी मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून, वनहक्क जमिनींचे प्रलंबित असलेले ७ हजार ४९२ दावे निकाली काढण्यासाठी जमिनीची जीपीएस यंत्रणेद्वारे मोजणी करण्याचे काम सुरू झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ७७६ वनजमीन पट्ट्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

नाशिक  : आदिवासी मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून, वनहक्क जमिनींचे प्रलंबित असलेले ७ हजार ४९२ दावे निकाली काढण्यासाठी जमिनीची जीपीएस यंत्रणेद्वारे मोजणी करण्याचे काम सुरू झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ७७६ वनजमीन पट्ट्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (ता. ११) महसूल विभागाची आढावा बैठक घेतली. या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महसूलमंत्र्यांच्या आदेशान्वये वनहक्क जमिनींचे प्रकरण निकाली काढण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. वनहक्क जमिनींचे दावे सोडविण्यासाठी जिल्हा स्तरावर नाशिक व मालेगाव येथे समिती गठीत केली आहे.

आदिवासी विभागातील कार्यालयांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यासाठी नवीन कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून, त्यांना नियुक्तीचे आदेशही देण्यात आले आहे. हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी समितीच्या दोन बैठका होतील. वनहक्क जमिनींची मोजणी जीपीएस यंत्रणेद्वारे होईल. त्यासाठी चाळीस जीपीएस मशिन खरेदी करण्यात आल्या आहेत.

येत्या २० एप्रिलपर्यंत मोजणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. शिवाय जे आदिवासी जमिनींची कागदपत्रे सादर करतील, त्यांच्या जमिनींची टेबल मोजणी केली जाईल. 

आतापर्यंत ७७६ जमीन पट्ट्यांचे वाटप करण्यात आले आहे. याबाबतचा सर्व आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जाईल. सात हजारांहून अधिक वनहक्क जमिनींचे दावे पूर्ण करणे, हे लक्ष्य असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

मागणी तेथे टँकर
जिल्ह्यात जलयुक्त शिवार व गतवर्षी चांगले झालेले पर्जन्यमान यामुळे फारशी पाणीटंचाई नाही. तरीदेखील मागणी झाल्यास तेथे पाण्याचा टँकर देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. राज्य शासनाने सर्व कागदपत्रांचे स्कॅनिंग करायचे ठरवले होते. नाशिक विभागात १ कोटी ७६ लाख २९ हजार कागदपत्रांचे स्कॅनिंग पूर्ण झाल्याचा दावा पाटील यांनी केला. २०१८ या वर्षात ८ लाख ५९ हजार ऑनलाइन दाखले नागरिकांना देण्यात आलेे. सेवा हक्क कायद्याअंतर्गत वेेळेवर सेवा मिळाली नाही, तर ते अपील करू शकतात. मात्र, याबाबत नाशिकमध्ये एकही तक्रार प्राप्त नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच, जिल्ह्यातील सात तालुक्यांत संगणकीकृत सातबारा देण्याचे काम शंभर टक्के पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कर्जमाफीची माहिती पेनड्राइव्हमध्ये 
कर्जमाफी लाभार्थींची सर्व माहिती एका पेनड्राइव्हमध्ये असून, विधिमंडळात त्याचे सादरीकरण करण्यात आल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. कर्जमाफी कोणाला मिळाली याची सर्व माहिती शासनाकडे आहे. फक्त १४ हजार शेतकऱ्यांची नावे वेगवेगळ्या कॅटॅगरीमध्ये दाखविण्यात आल्याने याबाबत घोळ निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

इतर बातम्या
'सकाळ'चे दिवाळी अंक अॅमेझॉनवर !पुणे : क्लिकवर चालणाऱया आजच्या जगात दिवाळी अंकही...
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
शेतीपूरक व्यवसायातून वर्षभर उत्पन्नाची...नांदेड  ः एकात्मिक शेती पद्धती अंतर्गत...
मराठवाड्यात हुमणीचा १७ हजार हेक्‍टरला...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोरील संकटे...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
कोल्हापुरात आठ हजार एकरांवर हुमणीचा...कोल्हापूर : पावसाने दिलेली दडी व प्रतिकूल...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
डॉ. हद्दाड आणि डाॅ. नॅबार्रो यांना २०१८...पुणे : जगभरातील कुपोषित माता आणि बालकांना...
संपूर्ण देशातून मॉन्सून परतलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) रविवारी (ता...
उन्हाचा चटका वाढलापुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर कमाल...
पाणीटंचाईने संत्राबागांची होरपळअमरावती ः विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या...
हुमणीग्रस्त ऊसक्षेत्र चार लाख हेक्टरवरपुणे ः राज्यात दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या...
द्राक्षपट्ट्याला दुष्काळाचे ग्रहणसांगली ः गेल्यावर्षीपेक्षा यंदा पाऊस कमी झालाय......
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...