Agriculture news in marathi, AGROWON, FRP, Sugarcane fair and remunerative price, prof. Vijay Paul sharma | Agrowon

देशभरात एकच ‘एफआरपी’ असावी
विजय गायकवाड
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

मुंबई : देशभरात एकाच पद्धतीने रास्त आणि किफायतशीर दराने (एफआरपी) ऊस दर निश्चित करण्यासाठी केंद्रीय कृषिमूल्य आयोग आग्रही आहे. साखर आणि उसाच्या दरात होणारी घट भरून काढण्यासाठी ऊस उत्पादक, कारखानदार आणि ग्राहकांच्या योगदानातून `ऊस दर स्थिरीकरण निधी` उभारावा, अशी मागणी केंद्रीय कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष प्रा. विजय पॉल शर्मा यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. 

मुंबई : देशभरात एकाच पद्धतीने रास्त आणि किफायतशीर दराने (एफआरपी) ऊस दर निश्चित करण्यासाठी केंद्रीय कृषिमूल्य आयोग आग्रही आहे. साखर आणि उसाच्या दरात होणारी घट भरून काढण्यासाठी ऊस उत्पादक, कारखानदार आणि ग्राहकांच्या योगदानातून `ऊस दर स्थिरीकरण निधी` उभारावा, अशी मागणी केंद्रीय कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष प्रा. विजय पॉल शर्मा यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. 

मुंबईत नुकतीच तीन दिवसांची साखर परिषद संपन्न झाली. या परिषदेमध्ये सहभागी प्रा. शर्मा म्हणाले, की एफआरपीच्या देशव्यापी अंमलबजावणीने ऊस दरामधे पारदर्शकता आणि सुसूत्रीकरण येईल, असा विश्वास आहे. ऊस दरासाठी किंमत स्थिरीकरण निधी उभा करण्यात यावा. या निधी उभारणीमधे सरकारचा सहभाग नको, परंतु ऊस उत्पादक शेतकरी, कारखानदार आणि ग्राहकांच्या सहभागातून या निधीची उभारणी करण्यात यावी. महाराष्ट्राची साखर उद्योगाची मक्तेदारी उत्तर प्रदेशाकडून मोडीत निघण्याची शक्यता व्यक्त करून ते म्हणाले, की आगामी काळात केंद्रीय कृषिमूल्य आयोगाचे कामकाज जास्तीत जास्त लोकाभिमुख होणार अाहे.

‘सॅप’ बंद करावी ः विजय शर्मा
२०१३  मधे डॉ. रंगराजन समितीच्या शिफारसींवरून साखर उद्योग नियंत्रणमुक्त केला. एफआरपीनुसार दर निश्चितीचे धोरण स्वीकारले. परंतु साखर उद्योगाच्या चढ-उतारीचे चक्र पाहता दर घटल्यानंतर भरपाई कशी करावी, याबाबत समितीच्या शिफारसींमधे तरतूद नाही. साखर उद्योगाच्या चढउताराची मालिका पाहता, काही राज्यात सुरू असलेली सॅप (राज्य निर्धारित मूल्य) बंद करण्याची गरज आहे, असे मत प्रा. शर्मा यांनी व्यक्त केले आहे.

 

इतर अॅग्रो विशेष
अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधनपुणे : आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने भारतीय...
महिला सक्षमीकरण, शाश्वत शेतीसाठी झटणारी...सातारा जिल्ह्यातील ॲवॉर्ड संस्था शाश्वत शेती...
शेंगालाडू व्यवसायातून नीशाताईंना मिळाले...पंढरपुरात एकादशी तसेच अन्य दिवशी येणाऱ्या...
पाणीटंचाईच्या झळा वाढू लागल्यापुणे : उन्हाचा चटका वाढत असून पाणीटंचाईच्या झळा...
कोकण, मध्य महाराष्ट्रात हवामान अंशतः...पुणे : अरबी समुद्र ते दक्षिण महाराष्ट्र या...
‘मांजरी मेडिका’ द्राक्ष ज्यूस वाण...पुणे : मांजरी येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन...
‘स्वाभिमानी’ आणि ‘रयत क्रांतीत’ संघर्षसोलापूर : माढा दौऱ्यावर असलेले  कृषी...
सदाभाऊंच्या ताफ्यावर गाजर, तूर, मका...सोलापूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या...
लहान वृक्षात संधी महानबोन्सायच्या बहुतांश व्याख्येत छोट्या कुंडीत वृक्ष...
शेतकरी मंडळांची दखल घेणार कोण?आम्ही शेतकरी मागील दहा वर्षांपासून कृषी ...
साखर १०० रुपयांनी उतरलीकोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी साखरेचे वाढलेले दर...
हरभऱ्याच्या किमतीत सुधारणांसाठी सर्व...नवी दिल्ली : हरभऱ्याच्या घसरत्या किमती...
‘चारा छावणी गैरव्यवहारप्रकरणी १४८...सांगली ः दुष्काळी स्थितीत २०१२ ते २०१३ आणि २०१३-...
कापूस गाठींच्या साठ्यासाठी होतोय आटापिटाजळगाव ः गुलाबी बोंड अळीने कापूस उत्पादकांच्या...
प्रश्न हाताळण्याची मुख्यमंत्र्यांची...परभणी : कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्येचे...
अडीच हजार कोटींची एफआरपी थकलीपुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक...
कृषी कार्यालयाच्या शिपायाने घातला...बुलडाणा : कृषी खात्यात कार्यरत असलेल्या एका...
पाणी योजनेच्या वीजबिलात आर्थिक मदत...मुंबई  : ग्रामीण भागातील पाणीपुरवठा...
बीटी बियाणे दराचा केंद्राकडून पुनर्विचारनागपूर ः बीटी दराबाबत पुनर्विचार करण्याच्या...
बियाणेवाटपाच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून...पुणे : ठेकेदारांशी संगनमत करून निकृष्ट...