agriculture news in Marathi, agrowon, The fuse wire stolen by farmers | Agrowon

रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या चोरीने शेतकरी त्रस्त
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 मे 2018

परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्रावरील बाॅक्समधील फ्यूजमधील तांब्याच्या तारांची चोरी केली जात असल्यामुळे सुरळीत, अखंड वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्यामुळे नुकसान होत आहे.

परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्रावरील बाॅक्समधील फ्यूजमधील तांब्याच्या तारांची चोरी केली जात असल्यामुळे सुरळीत, अखंड वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्यामुळे नुकसान होत आहे.

जायकवाडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील सिंगणापूर परिसरातील अनेक गावशिवारात यंदा सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. परंतु कृषी पंपाना आठ तासदेखील सुरळीत वीजपुरवठा केला जात नाही. गेल्या काही दिवसांपासून रोहित्रावरील बाॅक्समधील फ्यूजच्या तांब्याच्या तारांची चोरी केली जात आहे. फ्यूज फोडून टाकले जात आहेत. त्यामुळे आधीच दरवाजे नसलेले, गंजून गेलेले बाॅक्स अधिकच धोकादायक झाले आहेत.

महावितरण कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकरी वर्गणी जमा करून नवीन फ्यूज बसवीत आहेत. परंतु फ्यूजमधील तांब्याच्या तारेची चोरी करताना फ्यूजची नासधूस केली जात आहे. कृषी पंपाने सुरळीतपण वीजपुरवठा होत नाही. विहिरीमध्ये पाणी असूनही सिंचनासाठी त्याचा उपयोग होत नसल्याचे चित्र या परिसरात आहे. फ्यूजच्या सुरक्षितेतेसाठी रोहित्राना नवीन बाॅक्स बसविण्यात यावेत, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीकडे केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...