agriculture news in Marathi, agrowon, ginger cultivation in Progression in the district of Satara | Agrowon

सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गती
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 मे 2018

सातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले लागवडीस सध्या सातारा जिल्ह्यात वेग आला आहे. आले पिकाच्या दरात झालेल्या वाढीमुळे जिल्ह्यात एकूण क्षेत्राच्या १५ ते २० टक्के क्षेत्रात वाढ होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.  

सातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले लागवडीस सध्या सातारा जिल्ह्यात वेग आला आहे. आले पिकाच्या दरात झालेल्या वाढीमुळे जिल्ह्यात एकूण क्षेत्राच्या १५ ते २० टक्के क्षेत्रात वाढ होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.  

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह दुष्काळी तालुक्‍यामधील शेतकरी आले पीक घेतात. आले पिकाच्या दरात एप्रिल महिन्याच्या अखेरीपासून दरात सुधारणा होण्यास प्रारंभ झाला होता. आल्यास प्रतिगाडीस (५०० किलो) दहा ते १२ हजारावरून ३० हजार ते ३५ हजारांपर्यंत दर गेले होते. यामुळे शेतकऱ्यांना बियाण्यासाठी केली जाणारी आल्याची विक्री पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मे महिन्याच्या दुसऱ्या सप्ताहापासून दरात पुन्हा घसरण होऊन आल्याच्या प्रतिगाडीस २३ ते २५ हजारांपर्यंत आले आहेत.

सध्या यादरम्यान दर स्थिर आहेत. दर कमी जास्त असले तरी सातारा जिल्ह्यात सरासरी २२०० ते २५०० हेक्‍टर क्षेत्रावर लागवड होत असते. यामध्ये प्रामुख्याने कोरेगाव, सातारा, खटाव तालुक्‍यांत सर्वाधिक लागवड केली जाते. इतर तालुक्‍यातही कमी अधिक प्रमाणात आले लागवड होते. जिल्ह्याच्या अनेक भागात उन्हाळी पाऊस झाल्याने उष्णता कमी होण्यास मदत झाल्याने १५ मेपासून आले लागवडीस प्रारंभ झाला आहे. 

सध्या जिल्ह्यात २५ ते ३० टक्के क्षेत्रावर आले लागवडीचे कामे उरकले असून, सध्या लागवडीस वेग आला आहे. जसजशी उन्हाची तीव्रता कमी होईल तसतसा आले लागवडीस आणखी वेग येणार आहे. १० जूनपर्यंत आले लागवडीची कामे उरकण्याची शक्‍यता आहे. 

बियाणे कमतरता
आले लागवडीसाठी साधारणपणे मार्च महिन्यापर्यंत काढणी केलेले बियाणे वापरले जाते. नवीन लागवडीसाठी लागणाऱ्या आले बियाण्याची शेतकऱ्यांकडून खरेदी करून ठेवण्यात आली आहे. बियाणे खरेदीच्या दरम्यान दर कमी असल्याने बियाण्याची खरेदी झाली आहे. तद्‌नंतर एप्रिलच्या अखेरीस आल्याच्या दरात सुधारणा होण्यास प्रारंभ झाला होता. मात्र, यादरम्यान बियाण्याचा कालावधी पुढे गेला आहे. यामुळे अपेक्षित क्षेत्रात वाढ होणार नसून एकूण क्षेत्राच्या १५ ते २० टक्के क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञाकडून व्यक्त केला जात आहे. 

उष्णता कमी होत असल्याने आले लागवड सुरू आहे. आतापर्यंत पाच एकर क्षेत्रावरील लागवडीची कामे उरकली आहेत. आले दर वाढले असले तरी बियाणे काढणीचा कालवधी पुढे गेला असल्याने आल्याच्या क्षेत्रात अपेक्षित वाढ होण्याची शक्‍यता कमी आहे. 
- जयवंत पाटील, प्रगतशील शेतकरी, पाल, जि. सातारा. 

सध्याचे दर 

३५ ते ४० हजार रुपये 

बियाण्यासाठी लागणारे आले प्रतिगाडीस 
(५०० किलो)  २३ ते २६ हजार रुपये

 

इतर ताज्या घडामोडी
पाणी अमूल्य असल्याने जनजागृतेची गरज ः...कोल्हापूर : ‘‘पाण्यासाठी व्यापक जनजागृती होणे...
येवला तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी वणवणनाशिक : कमी पावसामुळे येवला तालुक्यात पाणीटंचाई...
हवामानविषयक समस्यांमुळे शेतीवर परिणाम ः...परभणी ः जागतिक तापमान वाढ, पावसातील अनियमितता,...
मतदार यादीत वाढला महिलांचा टक्कानगर : निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी जिल्हा...
तापमानातील चढ-उताराचा अंजीर उत्पादकांना...परभणी : तापमानातील चढ-उतारामुळे अंजिराची फळे...
गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक कमी; दर वाढलेपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
यंदा मतदानात महिला पुरुषांना मागे टाकणारनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये पुरुषांपेक्षा...
शक्तिशाली उल्कापातापासून बचावली पृथ्वीपुणे ः अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था ‘नासा’...
संत्रा बागांना उरला केवळ टॅंकरचा आधारअमरावती : संत्रा बागा जगविण्यासाठी...
मराठवाड्याच्या पाण्यासाठी फक्त बोलून...परभणी : केवळ जायकवाडीच्या हक्काच्या...
राज्यात चार हजाराने मतदान केंद्रे वाढलीमुंबई  : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात...
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीचा...मुंबई : गेले सहा महिने विविध समविचारी पक्षांशी...
चंद्रपूर : बांगडेंच्या उमेदवारीने...चंद्रपूर : गेल्या पंधरवाड्यापासून चंद्रपूर...
प्रियांका गांधींचा नागपुरात होणार रोड शोनागपूर ः काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ...
अमरावती लोकसभेसाठी होईल दुहेरी लढतअमरावती : शिवसेनेकडून दोनदा संसदेत गेलेल्या...
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...