agriculture news in Marathi, agrowon, Going to the farmer's house The Chief Minister did not have time | Agrowon

शेतकऱ्यांच्या घरी जायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही : नाना पटोले
टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 एप्रिल 2018

यवतमाळ : "जिल्ह्यात पुन्हा दुर्दैवी घटना घडली आहे. चार दिवसांपासून शेतकऱ्याचे शव शासकीय रुग्णालयात होते. मात्र, शासनाला याचे घेणेदेणे नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात उमरखेड येथे येऊनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी वेळ नाही. मुख्यमंत्री येणार असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांना २४ तासांपासून नजरकैदेत ठेवले. आम्ही आता भाजपसाठी अतिरेकी झालो आहोत'', असे शरसंधान माजी खासदार नाना पटोले यांनी भाजपवर साधले.

यवतमाळ : "जिल्ह्यात पुन्हा दुर्दैवी घटना घडली आहे. चार दिवसांपासून शेतकऱ्याचे शव शासकीय रुग्णालयात होते. मात्र, शासनाला याचे घेणेदेणे नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात उमरखेड येथे येऊनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी वेळ नाही. मुख्यमंत्री येणार असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांना २४ तासांपासून नजरकैदेत ठेवले. आम्ही आता भाजपसाठी अतिरेकी झालो आहोत'', असे शरसंधान माजी खासदार नाना पटोले यांनी भाजपवर साधले.

येथील विश्राम भवनात आयोजित पत्रकार परिषदेत पटोले बोलत होते. या वेळी बाबासाहेब गाडे पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष माधुरी अराठे आदी उपस्थित होते. 

पटोले म्हणाले की, "शंकर चायरे या शेतकऱ्याने पंतप्रधानांचे नाव लिहून आत्महत्या केली. त्याची दखल प्रशासनाने घेतली तर नाहीच, मुख्यमंत्री तर दूरच; पालकमंत्र्यांनाही मृत शेतकरी कुटुंबातील सदस्यांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी वेळ मिळाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रशासनाने घटनेची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी या घटनेला पाठ दाखविण्यापेक्षा शेतकरी कुटुंबाची कैफियत जाणून घेणे आवश्‍यक होते. बोंड अळीच्या वेळेसही मुख्यमंत्री लपून छपून जिल्ह्यात आल्याचा आरोपही पटोले यांनी केला. 

शेतकरी आत्महत्या होत असतानाही सरकारला काळजी नाही. मुख्यमंत्री उमरखेडमध्ये येऊन जातात. मात्र, यवतमाळमध्ये येऊन मृत शेतकरी कुटुंबाची भेट घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसल्याचा आरोपही पटोले यांनी केला.
मध्यस्थीसाठी बैठक

गेल्या चार दिवसांपासून शंकर चायरे यांचे शव शासकीय रुग्णालयात होते. शासकीय नोकरी व मदत देण्याची त्यांच्या कुटुंबीयांची मागणी होती. गुरुवारी (ता. १२) नाना पटोले यांच्या मध्यस्थीने शंकर चायरे यांची पत्नी व मुलगी, पालकमंत्री, प्रशासनाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. मृत शेतकऱ्याच्या मुलीला खासगी कंपनीत सुपरवायझर पदावर तत्काळ नियुक्ती देणार असल्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी सांगितले. 

इतर ताज्या घडामोडी
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...