agriculture news in Marathi, agrowon, Good quality cotton shortage crisis | Agrowon

वस्त्रोद्योगासमोर दर्जेदार कापूस तुटवड्याचे संकट
टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 एप्रिल 2018

जळगाव : कापडमिलसाठी चांगल्या दर्जाचे सूत आवश्‍यक असून चांगल्या सुतासाठी गुणवत्तापूर्ण रुई किंवा कापसाची गरज आहे. मात्र असे असतानादेखील देशात गिझा व पीमा या लांब धाग्याच्या कापूस उत्पादनाबाबत अद्याप एकाही शासकीय संस्थेने पुढाकार घेतला नाही. आता तर जो कापूस पिकतो, त्याचाही दर्जा व उत्पादन गुलाबी बोंड अळीने घटले आहे. सुमारे २५ कोटी जणांना रोजगार देणाऱ्या वस्त्रोद्योगाला दर्जेदार रुईसाठी अमेरिका, ऑस्ट्रेलियावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. यात मोठ्या प्रमाणात परकीय चलन गमावावे लागत असून, दर्जेदार कापूस तुटवड्याचे संकट वस्त्रोद्योगासमोर उभे ठाकले आहे. 

जळगाव : कापडमिलसाठी चांगल्या दर्जाचे सूत आवश्‍यक असून चांगल्या सुतासाठी गुणवत्तापूर्ण रुई किंवा कापसाची गरज आहे. मात्र असे असतानादेखील देशात गिझा व पीमा या लांब धाग्याच्या कापूस उत्पादनाबाबत अद्याप एकाही शासकीय संस्थेने पुढाकार घेतला नाही. आता तर जो कापूस पिकतो, त्याचाही दर्जा व उत्पादन गुलाबी बोंड अळीने घटले आहे. सुमारे २५ कोटी जणांना रोजगार देणाऱ्या वस्त्रोद्योगाला दर्जेदार रुईसाठी अमेरिका, ऑस्ट्रेलियावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. यात मोठ्या प्रमाणात परकीय चलन गमावावे लागत असून, दर्जेदार कापूस तुटवड्याचे संकट वस्त्रोद्योगासमोर उभे ठाकले आहे. 

बीटीमधील बीजी तंत्रज्ञान जसे अमेरिकेकडून घेतले, तसे लांब धाग्याच्या कापसाचे तंत्रज्ञान घेऊन त्यावरही देशात काम केले जावे आणि हे तंत्रज्ञान देशात उपलब्ध करावे, असा मुद्दाही वस्त्रोद्योगातील जाणकार, तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. कापूस लागवडीत व उत्पादनात भारत आघाडीवर आहे. परंतु देशांतर्गत बाजारात रुईची मागणी या हंगामात तीन टक्‍क्‍यांनी वाढली आहे. जगातही सुमारे अडीच टक्के मागणी वाढली आहे. 

देशात ४६० सहकारी तर १७०० खासगी सूतगिरण्या आहेत. राज्यात १३३ सहकारी सूतगिरण्या असून, पैकी ६१ सुरू आहेत. राज्यात नव्या वस्त्रोद्योग धोरणातून आणखी २० सूतगिरण्या खानदेश, विदर्भ व मराठवाड्यात साकारत आहेत. गुजरातेत ३० सूतगिरण्या मागील चार वर्षांत वाढल्या आहेत. तेथे आजघडीला ७८ सूतगिरण्या जोमात सुरू असून, सुमारे आठ हजार जिनिंग कारखाने देशात आहेत.

पॉवरलूम व कापडगिरण्यांची संख्या उत्तर प्रदेश व दाक्षिणात्य भागात मोठी आहे. वस्त्रोद्योगात मोडणाऱ्या जिनिंग, स्पिनींग, व्हीविंग मिला, पॉवरलूममधील होजिअरी, गारमेंट व प्रोसेसिंग युनिटना डिसेंबर ते मे या दरम्यान प्रतिमहिना सुमारे २७ लाख गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) गरज आहे. दीड वर्षापूर्वी ही गरज २४ लाख गाठींची होती. वस्त्रोद्योग हा शेतीनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा रोजगार देणारा उद्योग असून, २५ कोटी जण त्यावर निर्भर आहेत. 

देशात वस्त्रोद्योगाला दरवर्षी किमान ३६० लाख गाठींची गरज आगामी वर्षापासून भासणार आहे. ही गरज मात्र भारत पूर्ण करू शकत नाही, कारण यंदा भारताचे उत्पादन कमाल ३६२ ते ३६७ लाख गाठींपर्यंत येणार आहे. तर पुढील हंगामातही गुलाबी बोंड अळीवर उपाय न सापडल्याने गाठींचे उत्पादन ३४५ लाख गाठींवरच असेल. यात निर्यात, नुकसान, शिलकी गाठी या सर्व बाबी लक्षात घेता देशांर्तगत वस्त्रोद्योगाला कापूस आयातीवर भर द्यावा लागत आहे. 

मागील कापूस हंगामात (१ ऑक्‍टोबर २०१६ ते ३० सप्टेंबर २०१७) या काळात ३१ लाख गाठींची आयात करावी लागली. यंदा गुलाबी बोंड अळीने कापसाचा दर्जा घसरला व कमी उत्पादनाचे संकेत लक्षात घेता सूतगिरण्या, मोठ्या उद्योगांनी रुईची आयात वाढविली. ती आजघडीला १८ लाख गाठींपर्यंत पोचली आहे. ३० सप्टेंबर २०१८ अखेर ती वाढू शकते, असा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत. अशात दरवाढ, कापसाचा तुटवडा, आयातीमधील अडथळे, अशा अनेक समस्यांना वस्त्रोद्योगाला तोंड द्यावे लागत आहे. परकीय गाठींच्या दरवाढीमुळे उत्तरेकडील पॉवरलूमवर परिणाम झाला. 

 देशात पीमा, गिझा का पिकत नाही?
पीमा व गिझा हा कापूस ३५ मिलीमीटर लांबीचा आहे. एवढ्या लांबीचा कापूस चीनसह पाकिस्तान, बांगलादेशसह भारतातही उत्पादित होत नाही. त्याचे तंत्रज्ञान ऑस्ट्रेलिया, अमेरिका व तुर्कीकडे आहे. भारतात कमाल २९ मिलीमीटर लांबीचा कापूस उत्पादित होतो. ३५ मिलीमीटरचा कापूस आयात करावा लागत असून, या कापसाचे उत्पादन देशात सुरू झाले तर भारत जगातील क्रमांक एकचा कापूस निर्यातदार ठरेल आणि आयातीवरील अवलंबित्वही संपेल. जसे अमेरिकेकडून बीटीमधील बोलगार्डचे तंत्रज्ञान घेऊन त्यावर देशात काम सुरू झाले, तसे अधिक लांबीच्या कापसाच्या उत्पादनासाठीही कृषी संशोधन संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत लोणखेडा (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष दीपकभाई पाटील यांनी ॲग्रोवनशी बोलताना व्यक्त केले. 

देशातील रुईचा ताळेबंद
उत्पादन - ३६२ ते ३६७ लाख गाठी

देशांतर्गत वस्त्रोद्योगाची गरज - सुमारे ३६० लाख गाठी

निर्यात - ४५ लाख गाठी (२० मार्चअखेर)

आयात - १८ लाख गाठी (२० मार्चअखेर)

देशातील सूतगिरण्या - सुमारे २२००

जिनिंग कारखाने - सुमारे ८०००

वस्त्रोद्योगावर अवलंबून असलेले कामगार, अधिकारी - सुमारे २५ कोटी

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...
सरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर   ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...
सोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...
गिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...
मालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...
परभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...
साताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...