agriculture news in Marathi, agrowon, Governance is committed for overall development of the state | Agrowon

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 3 मे 2018

मुंबई : कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या जवळपास ३ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, लातूर येथे होणाऱ्या रेल्वे डब्याच्या कारखान्यांमुळे प्रत्यक्षात २५ हजार नोकऱ्यांची निर्मिती आणि पुढील वर्षापर्यंत सर्व बेघरांना हक्काची घरे देण्यासाठी १२ लाख घरे, तसेच पुढील पाच वर्षांत एक लाखापेक्षा अधिक रोजगार निर्मिती या शासनाच्या महत्त्वाकांक्षी निर्णयाची माहिती देतानाच राज्याची सर्वांगीण प्रगती आणि विकास साध्य करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. 

मुंबई : कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या जवळपास ३ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, लातूर येथे होणाऱ्या रेल्वे डब्याच्या कारखान्यांमुळे प्रत्यक्षात २५ हजार नोकऱ्यांची निर्मिती आणि पुढील वर्षापर्यंत सर्व बेघरांना हक्काची घरे देण्यासाठी १२ लाख घरे, तसेच पुढील पाच वर्षांत एक लाखापेक्षा अधिक रोजगार निर्मिती या शासनाच्या महत्त्वाकांक्षी निर्णयाची माहिती देतानाच राज्याची सर्वांगीण प्रगती आणि विकास साध्य करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. 

शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. एक प्रभावशाली, प्रगत महाराष्ट्र घडविण्यासाठी शासनाबरोबर सर्वांनी सहभागी होऊन योगदान द्यावे, असे आवाहन करून त्यांनी यावेळी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.

या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे आदी उपस्थित होते. या वेळी आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्ताने राज्यपाल यांनी श्रमिक वर्गाला शुभेच्छा दिल्या. राज्य शासन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी बांधिल आहे.

मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार आणि विहिरी खोदणे यांसारख्या योजना राबवून शासन राज्यभरातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे. चालू वर्षात शासनाने २ लाख २६ हजार हेक्टर इतकी सिंचनक्षमता निर्माण करण्याचे आणि पाण्याच्या साठवण क्षमतेत ८५३ दशलक्ष घनमीटरपर्यंत वाढ करण्याचे योजले आहे. काम सुरू असलेले ५० सिंचन प्रकल्प शासन प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर देत आहे.

कर्जमाफी योजनेअंतर्गत, ५५ लाखांपेक्षा अधिक खातेधारक शेतकऱ्यांना कृषी कर्जमाफी देण्यात आली आहे. त्यापैकी साडेसेहेचाळीस लाख खातेधारक शेतकऱ्यांना याचा प्रत्यक्ष लाभ झाला आहे. आतापर्यंत, १४ हजार ७८९ कोटी रुपये इतकी रक्कम, ३७ लाख २० हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करण्यात आल्याचे राज्यपाल यांनी सांगितले. 

इतर ताज्या घडामोडी
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या...
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...